आज बुद्ध पौर्णिमा या खास पौर्णिमेच्या दिनी आकाशात सुपर फ्लॉवर मूनचं दर्शन झालंय. Photo by ANIआजच्या सूपरमूनसोबतच चंद्रग्रहण पाहण्याचाही योग होता. Photo by ANIया चंद्रग्रहणाचा ३५ मिनिटांचा कालावधी संपल्यानंतरही सूपरमून पाहता येणार आहे. Photo by ANIपृथ्वीच्या सावलीत चंद्र पूर्ण झाकला गेल्यानं तो लाल रंगाचा दिसतो त्यावेळी त्याला ब्लड मून बोललं जातं. तर त्याचा आकार सर्वात मोठा असल्यानं सूपरमून म्हणून संबोधलं जातं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)२०२१ या वर्षातील हा दुसरा सूपरमून आहे. एप्रिल महिन्यातंही याचं दर्शन झालं होतं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात कमी अंतरावर असतो त्या दिवशी चंद्राचा आकार सर्वात मोठा दिसतो, त्यामुळेच त्याला सूपरमून संबोधलं जातं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)चंद्र ज्या दिवशी पृथ्वीच्या अगदी जवळ असतो तेव्हा तो इतर वेळेपेक्षा १५ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)महाराष्ट्रासह भारतातील विविध ठिकाणाहून ७ वाजण्याच्या सुमारास छायाकल्प चंद्रग्रहण दिसलं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)यंदाच्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ब्लड मून, सुपर मून आणि चंद्रग्रहण असा तिहेरी योग जुळून आला आहे. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)जगभरातून आजचा हा खगोलीय चमत्कार पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सामान्य लोकही प्रचंड उत्सूक आहेत. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)