‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे सध्या सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमुळे ती एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेनंतर अमृताने ‘चांदणे शिंपित जाशी’ या मालिकेत चारूची भूमिका साकारली. याच मालिकेतील अभिनेता अतुल आगलावेसोबतचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. अतुलला शुभेच्छा देताना अमृताने ‘आय लव्ह यू, नेहमी माझ्यासोबत राहा’, असं लिहिल्याने या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मालिकेत एकत्र काम करता या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं का, असा प्रश्न अमृताच्या चाहत्यांना पडला आहे.