जीएमसीत केवळ सहाच व्हेंटिलेटर उपलब्ध असून डॉक्टर, नर्ससह लहान मुलांसाठी हवे १५ व्हेंटिलेटर

अकोला ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या उपचारासाठी वैद्यकीय साहित्याची जुळवाजुळव शासकीय यंत्रणा करत असतानाच स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे (Government Medical College Akola) (जीएमसी) संचालित सर्वोपचार रुग्णालयामध्ये लहान मुलांसाठी केवळ सहाच व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त रुग्णालयात बाल रोग तज्ज्ञांची पदं (Posts of Pediatrician) सुद्धा रिक्त असून वाढीव खाटांसाठी ३० नर्सची आवश्यकता आहे. (Shortage of ventilator for corona affected children in Akola district)

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलं कोरोना बाधित होण्याचे प्रकार अधिक समोर आले.

त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी लहान मुलांच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली, तर संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक जपण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

या लाटेपूर्वीच बळकट आरोग्य यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून वैद्यकीय साहित्यासह औषधोपचाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा करत आहेत. असे असले तरी वऱ्हाडातील रुग्णांसाठी महत्वपूर्ण असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याची बाब समोर आली आहे.

Also Read: दिलासादायक; कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना आता मिळणार पगारी सुटी

लहान मुलांसाठी केवळ सहाच व्हेंटिलेटर

हजारो रुग्णांसाठी आशादायी ठरत असलेल्या या रुग्णालयात लहान मुलांसाठी केवळ सहाच व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याने अतिजोखमेच्या स्थितीत जीव वाचवण्यात आवश्यक असलेल्या या वैद्यकीय उपकरणाची संख्या वाढवण्याचे आव्हाण आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

Doctor

केवळ तीनच बाल रोग तज्ज्ञ कार्यरत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांवर उपचार करण्यासाठी केवळ तीनच बाल रोग विशेषतज्ज्ञ कार्यरत आहेत. सात सहयोगी प्राध्यापकांची आवश्यकता असल्यानंतर सुद्धा केवळ एकच सहयोगी प्राध्यापक कार्यरत आहेत. चार सहाय्यक प्राध्यापकांची गरज असल्यानंतर सुद्धा केवळ दोनच जबाबदारी संभाळत आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या याठिकाणी असल्याने तिसऱ्या लाटेत लहानग्यांना वाचवण्यासाठी मनुष्यबळीची कमतरता भरुन काढावी लागणार आहे.

Also Read: शिक्षकांच्या मृत्यूनंतर मिळणार सानुग्रह अनुदान

मदतीसाठी हव्या ३० नर्स

लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागातील २०, नवजात शिशूंच्‍या दहा खाटांसह कोरोना बाधितांच्या ६० खाटांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती होणाऱ्या बालकांसाठी ३० नर्सची आवश्यकता भविष्यात भासणार आहे. सदर मनुष्यबळ अद्याप येथे उपलब्ध नसल्याने लहान मुलांवर उपचार करताना अडचणी निर्माण होतील.

संपादन – विवेक मेतकर

Shortage of ventilator for corona affected children in Akola district

Also Read: कोरोना चाचणीसाठी वाडेगाव ग्रामस्थांना करावे लागले उपाेषण

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here