लांजा (रत्नागिरी) : बेकायदेशररित्या आठ जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना बोलेरो गाडीसह लांजा पोलिसांनी शनिवारी पहाटे ४:३० वाजता तालुक्यातील वाडगाव फाटा येथे पकडले. याप्रकरणी या चौघांवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.याबाबतची फिर्याद लांजा पोलिस दीपक कारंडे यांनी दिली असून याबाबत पोलिसांनी माहिती देली की,
हेही वाचा – त्या एकजुटीने देणार लढा : कशासाठी वाचा…
जनावरांची बेकायदेशीररित्या वाहतूक
रात्रीची गस्त घालीत असताना लांजा दाभोळे राज्यमार्गावर वाडगाव फाटा येथे बोलेरो पिकअप (एम एच १० एक्यू ९९६२) या गाडीतून आठ जनावर जनावरे कोंडून ती वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या जनावरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना समीर बाळासो मुजावर रा. इचलकरंजी(वय ३२), चेतन संजय घांगाळ रा.निपाणी (वय २५), तबरेज ठाकूर, गणेश गणपत लांबोरे रा.धुंदरे ता.लांजा या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा– परदेशी दौऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या इंजिनियरची मैदानावर अखेर…
यामधील गणेश लांबोरे यांच्या गोठ्यातील ही जनावरे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशने तबरेज याला ही जनावरे विकल्याचे स्पष्ट झाले आहे. तर समीर आणि चेतन हे दोघे गाडीतून या जनावरांची बेकायदा वाहतूक करीत असल्याचे उघड झाले आहे.याबाबत लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून जनावरांसह गाडी जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ४ लाख ३२ हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात लांजा पोलीस दीपक कारंडे, नितीन पवार, अरविंद कांबळे यांनी रात्रीची गस्त घालीत असताना ही कामगिरी बजावली.

News Story Feeds