जालना: जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिस मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील एका खाजगी रुग्णालायात 9 मे रोजी उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर काही युवकांनी डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचे म्हणत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरवात केला.

रुग्णालयात प्रशासनाने याची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी कदीम जालना पोलिसांनी लाठीचार्ज करत भाजप युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे.
Also Read: औरंगाबादेत दिवसभरात म्युकर मायकोसिसने सहा जणांचा मृत्यू
या मारहाणीत पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ‘साहेब माफ करा, साहेब माफ करा’ अशी याचना भाजपच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायलर झाल्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे.
Esakal