ज्या रुग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत, पण त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशा रुग्णांना गृह अलगिकरणात राहण्याची परवागनी दिली जात होती. मात्र, आता ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढीची टक्केवारी अधिक आहे आणि रिकव्हरी रेट कमी आहे, अशा जिल्ह्यात संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गृह अलिकरणला यापुढे परवानगी दिली जाणार नाही

अकोला ः कोरोना संसर्गाचे प्रमाण (incidence of corona infection) अधिक असलेल्या जिल्ह्यात गृह अलिकरण (Home Quarantine In Akola) बंद करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संस्थात्मक अलिकरणात ठेवण्याची तयारी राज्य सरकारतर्फे केली जात आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील गृह अलिकरणातील रुग्णांची संख्या व संस्थात्मक अलगिकरणासाठी असलेली व्यवस्था यात मोठा फरक असल्याने पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना ठेवणार कुठे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महानगरपालिका क्षेत्रात १२०० च्या वर रुग्ण गृह अलगिकरणात असताना मनपा क्षेत्रात फक्त २५० रुग्णांचीच व्यवस्था आहे. (Preparing to close home quarantine; Where will 2700 patients be kept?)

ज्या रुग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत, पण त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशा रुग्णांना गृह अलगिकरणात राहण्याची परवागनी दिली जात होती. मात्र, आता ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढीची टक्केवारी अधिक आहे आणि रिकव्हरी रेट कमी आहे, अशा जिल्ह्यात संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गृह अलिकरणला यापुढे परवानगी दिली जाणार नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश पोटे यांनी जाहीर केले आहे.

Also Read: आजपासून ऑनलाईन भरणार ‘अकोल्याची जत्रा’

त्यामुळे गृह अलिकरणात असलेल्या रुग्णांना संस्थात्मक अलिकरणात ठेवावे लागणार आहे. सध्या अकोला जिल्ह्यात २७९४ रुग्ण गृह अलिकरणात आहे. या रुग्णांची व्यवस्था जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्यासाठी करावी लागणार आहे. मात्र, गतवर्षी पहिल्या लाटेनंतर करण्यात आलेली संस्थात्मक अलिकरणाची व्यवस्थाच जिल्ह्यात मोडून टाकण्यात आली असल्याने आता या रुग्णांना ठेवणार तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Also Read: १०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

महसूल यंत्रणा सज्ज, मनपाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्यासाठी महसूल विभागाकडून पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संस्थात्मक अलिकरणात ठेवण्यात फारश्या अडचणी येणार नाहीत. मात्र, मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या व संस्थात्मक अलगिकरणाची व्यवस्था यात मोठी तफावत असल्याने मनपा प्रशासनाकडून संस्थात्मक अलिकरणाची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.

मनपा क्षेत्रात तीनच ठिकाणी व्यवस्था
महानगरपालिकेतर्फे कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यासाठी तीनच ठिकाणी व्यवस्था आहे. त्यात आदिवासी विभागाच्या मुलांच्या वसतीगृहात ९० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर दोन ठिकाणी ५० रुग्णांना ठेवण्यात व्यवस्था आहे. त्यामुळे गृह अलगिकरणात असलेल्या रुग्णांना संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्याचा आदेश धडकल्यास मनपा प्रशासनाची तारांबळ उडणार आहे.

असे आहेत गृह अलगिकरणातील रुग्ण (२४ मे अखेर)
अकोला ग्रामीण ः १५८२
अकोला मनपा क्षेत्र ः १२१२
ग्रामीण व मनपा क्षेत्र मिळून एकूण ः २७९४

vaccination

घरपौच औषध कीटचे वाटप
मनपा क्षेत्रातील लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृह अलिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना औषध कीटचे वाटपही मनपा प्रशासनाकडून केले जात आहे.त्यानंतरही अकोला मनपा क्षेत्रातील संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गृह अलिकरणाचा आदेश रद्द होऊन १२०० वर रुग्णांना संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्याची तयारी मनपा प्रशासनाला तातडीने करावी लागणार आहे.

गृह अलगिकरण रद्द करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार सुरू आहे. अद्याप मनपा प्रशासनाला त्यासंदर्भात कोणतेही आदेश मिळाले नाहीत. संस्थात्मक अलिकरणासाठी मनपाकडे तुर्तास पुरेशी व्यवस्था नसली तरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व्यवस्था करण्यात येईल. सध्या मनपा क्षेत्रात दोन खासगी केंद्रासह तीन ठिकाणी संस्थात्मक अलगिकरणाची व्यवस्था आहे.
– डॉ. अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी, मनपा, अकोला

संपादन – विवेक मेतकर

Preparing to close home quarantine; Where will 2700 patients be kept?

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here