शरीराची योग्य वाढ व्हावी असं वाटत असेल तर आहारात पालेभाज्यांचा समावेश हमखास केला पाहिजे. पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह, प्रोटिन, कॅल्शिअम याची मात्रा असते. म्हणूनच, आज आपण पालक खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
हिरवागार पालक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून त्यात शरीरासाठी लागणाऱ्या अनेक पोषक घटकांचा समावेश आहे.
पालकामध्ये व्हिटामिन सी चं पुरेपूर प्रमाण असतं. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सोबतच इम्युनिटी बूस्टही होते.
पालकामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणावर असतं.
पालकामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ, डोळ्यातून पाणी येणे या तक्रारी दूर राहतात.
पालकामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
पालकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं.
पालकाच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात.
त्वचेशी निगडीत काही समस्या असतील तर त्या दूर होतात. सोबतच त्वचा मुलायम होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here