सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारत ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल तुम्हाला आठवतेय का? २००५ मध्ये स्नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चनसारखी ती दिसत असल्याने तिची खूप चर्चा झाली होती. आता स्नेहाने नुकतेच तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून तिची तुलना पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबत होतेय. स्नेहाने ‘ब्रायडल फोटोशूट’चे फोटो पोस्ट केले असून तिचा लूक ‘जोधा अकबर’मधील ऐश्वर्याच्या लूकसारखाच आहे. ‘ऐश्वर्याची झेरॉक्स कॉपी’, ‘ही ऐश्वर्या आहे की स्नेहा उल्लाल’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर केल्या आहेत. स्नेहाने काही तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये तिला फारसं यश मिळालं नाही.