जैनपूर (जि.अमरावती) : लसीकरणासाठी सकाळपासून नागरिकांच्या लागलेल्या रांगा, शिस्तीने लस टोचून घेणारे नागरिक आणि त्यांना सहकार्य करणारे रुग्णालयातील कर्मचारी असे समाधानकारक चित्र ग्रामपंचायत परिसरात होते. आजच्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. कित्येक महिने, देशातील प्रत्येक घरातील मुले, वृद्ध आणि तरूण प्रत्येकाच्या मुखात एकच प्रश्न होता – कोरोनाची लस कधी येईल? आणि आता कोरोनाची लस आली आहे ती फार कमी कालवधीतच. ग्रामीण रुग्णालय येवदा व ग्रामपंचायत जैनपूरच्या सहकार्याने आज जैनपूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या करिता 120 लोकांना कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. (Disciplined vaccination of Covishield to the citizens at Jainpur)

दर्यापूर तालुक्यातील जैनपूर (पिंपळोद) येथे गुरुवार (ता.17) ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामपंचायत जैनपूरच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण पार पडले. या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती श्री बाळासाहेब हिंगणीकर, गजानन भाऊ देशमुख यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली.

Also Read: हंड्याने एक-एका झाडाला पाणी देऊन पिके जगविली, पण काही खरं झालं नाही

तसेच श्री प्रभाकर पाटील कोरपे सरपंच ग्रामपंचायत जैनपूर, उपसरपंच सहदेव मोरे, पोलिस पाटील मिलिंद जाणे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय ठाकरे उपस्थित होते. शिबिराकरिता डॉ. रुपाली बराटे ( वेते ), श्रीमती खोंड, एस. आर. खारंदे, राजेंद्र चंदणे, वर्षा गावंडे आशा वर्कर, राजेश सोनकर पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी गोपाल गावंडे,जनार्दन नेमाडे यांनी सहकार्य केले.

Also Read: शेगावचे गजानन महाराज ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र का म्हणायचे?

यावेळी संघर्ष युवा प्रतिष्ठानचे मंगेश पोटे,अमोल नागे, अभिजित नेवरकर, सचिन निचळ, विद्यानंद महल्ले, शुभम अढाऊ, शिवा ठाकरे, श्रीकृष्ण निचळ, शाहरुन अली, गौरव वाडेकर, निलेश जाणे, विकास गावंडे, श्याम नागे, मंगेश कोरपे, विठ्ठल कोरपे, शुभम कोरपे, रिंकू खान, ज्ञानेश्वर वाडेकर, सतिश जाणे व समस्त पदाधिकारी यांनी शिबिराच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले.

संपादन – विवेक मेतकर

Disciplined vaccination of covishield to the citizens at Jainpur

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here