स्पोर्टस् शूज : या शूजचा वापर करणारे लोक खूप परिश्रमी असतात. काहीतरी नवीन करणे हे नेहमीच त्यांच्या सवयीत असते आणि असे लोक आनंदी देखील पहायला मिळतात.
प्लॅटफॉर्म हिल्स : जे लोक प्लॅटफॉर्म हिल्स वापरतात, त्यांना लाइफमध्ये स्ट्राॅंग रहायला खूप आवडते. असे लोक फालतू गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाहीत.
चमकदार शूज : असे शूज आपल्याला एक वेगळाच लूक देतात, ज्याने आपली मनमोहक अदा इतरांना प्रभावीत करते. मात्र, हे शूज लाजाळू व्यक्तींना घालायला आवडत नाहीत. ज्या लोकांना हे शूज घालायला आवडतात, ते जीवनाचा मनमुराद आनंद घेताना दिसतात.
फॉर्मल शूज : फॉर्मल शूज घालणारे लोक नवीन प्रयोग करण्यास टाळतात आणि संतुलित जीवनावर विश्वास ठेवतात. असे लोक वेळेचे मूल्य चांगले ओळखतात.
हाई हिल्स : हाई हिल्सचा वापर करणाऱ्या व्यक्ती आत्मविश्वास बाळगून असतात. कोणत्याही कठीण प्रसंगात ते चारहात करण्यासही तयार असतात. त्यामुळे अशा व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात सुखी आणि समाधानी देखील असतात. त्याचबरोबर नेहमी तार्किक निर्णय घेण्यास ही ते प्राधान्य देतात.
कलरफुल कॅम्पस शूज : कॅम्पस शूजचा वापर करणाऱ्या लोकांची सामाजिक कार्यात एक वेगळीच क्रेझ पहायला मिळते. अशा लोकांवर इतरांचा लगेच प्रभाव पडतो, त्यामुळे या लोकांची समाजात वेगळी ओळख निर्माण होऊन त्यांचा प्रभावही वाढत असतो.
फ्लिप फ्लॉप्स : फ्लिप फ्लॉप्सचा वापर करणारे लोक व्यक्तिमत्त्वाने खूप आनंददायी आणि मस्त असतात. हे लोक स्वभावानेही फारच सभ्य असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here