तुळजाभवानी मातेच्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूस मोगरा, झेंडू, गुलाब आदीसह विविध फुलांच्या माळा लावण्यात आल्या.
तुळजापूर (जि.उस्मानाबाज) : तुळजाभवानी मातेस (Tuljabhavani Mata) गुरूवारी (ता.२७) मोगरा फुलांची सजावट करण्यात आली. तसेच हापूस आंब्याची आरासही करण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या (Tuljapur) गाभाऱ्यात भाविक अमित सोळसे यांच्या वतीने फुलांची सजावट करण्यात आली. तसेच तुळजा भवानी मातेचे भोपे पुजारी धनंजय वसंतराव कदम यांच्या वतीने आंबा अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मातेच्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूस मोगरा, झेंडू, गुलाब आदीसह विविध फुलांच्या माळा लावण्यात आल्या. तसेच तुळजाभवानी मातेच्या सिंहासनाच्या पाठीमागे पूर्णतः मोगऱ्याच्या माळा लावण्यात आल्या होत्या. तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावरील खांबासही फुलांच्या माळा लावण्यात आल्या. तसेच तुळजाभवानी मातेसमोर (Osmanabad) आंबा फळाशिवाय अनेक फळे सिंहासनावर ठेवण्यात आली. (Decoration Of Flowers To Tuljabhavani Mata)

Also Read: Video : औरंगाबाद तालुक्यासह चित्तेपिंपळगाव परिसरात जोरदार पाऊस
भोपे पुजारी अतुल मलबा कदम, विनोद सोंजी, विशाल सुनील सोंजी, मोहन पाटील, तुळजा भवानी मातेचे महंत हमरोजीबुवा, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजीबुवा यांनी पुजा बांधली. सेवेधारी शाम चोपदार, नितीन पवेकर, विशाल जाधव, पाळीकर पुजारी मंडळाचे सदस्य सचिन अमृतराव, विजय बोधले, तुळजाभवानी मंदिराचे कर्मचारी संकेत वाघे, रवी गायकवाड आदी उपस्थित होते.
Esakal