पिंपरी – पहिल्या लाटेत पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिस आयुक्तालयातील पावणे सहाशे कर्मचारी (Employee) बाधित झाले. चार जणांना जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत अद्याप केवळ तीनशेजण बाधित झाले आहेत. आयुक्तालय प्रशासनाने घेतलेली खबरदारी व लसीकरण (Vaccination) यामुळे दुसऱ्या लाटेत कर्मचारी, अधिकारी कोरोनापासून थोडे ‘सेफ’ (Safe) राहिल्याचे दिसून येत आहे. (Police Remain Safe from Corona in Second Wave)

पहिली लाट
-
कर्तव्यावर असलेल्या अनेक पोलिसांना संसर्ग
-
पिंपरी पोलिस दलात १५ मे २०२० ला पहिला कर्मचारी पॉझिटिव्ह
-
पहिल्या लाटेत ५६९ कर्मचारी, अधिकारी कोरोनाच्या विळख्यात
-
३४ जणांची प्रकृती खालावली होती
-
कोरोना सेल व प्रशासनाने रुग्ण गंभीर परिस्थितीतून सावरले
-
चार जणांना मात्र मृत्यू झाला.
Also Read: अपहरण, खुनी हल्ल्याप्रकरणी आमदार पुत्राला अखेर अटक
दुसरी लाट
-
दुसऱ्या लाटेतही अनेक कर्मचाऱ्यांना संसर्ग
-
मृत्यूचे प्रमाणातही वाढ
-
आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना लागण होण्याचे प्रमाण कमी
-
आतापर्यंत तीनशेजण बाधित झाले
-
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत प्रमाण कमी
-
खबरदारी व लसीकरणामुळे बाधित होण्याचे प्रमाण कमी
-
बाधा होणारे प्राथमिक उपचारातच होताहेत ठणठणीत
अशी घेतली जातेय खबरदारी
-
सर्वांना प्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या गोळ्या, ऑक्सिमीटर, पीपीई किट, थर्मल
-
कर्तव्यावर असताना मास्क, फेसशिल्ड, हातमोजे, सॅनिटायझरचा वापराच्या सूचना
-
वेळोवेळी केली जातेय आरोग्य तपासणी
-
कर्मचाऱ्यांना दिले गेलेत हेल्थ वॉच
-
शरीरातील ऑक्सिजन पातळी, ताप, रक्तदाबाची तत्काळ तपासणी
Esakal