वडगाव मावळ – मावळात (Maval) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या (Vaccination) तीन टप्प्यात आतापर्यंत ९४ हजार २२८ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे 9Dr Chandrakant Lohare) यांनी दिली. त्यात ७४ हजार ३६५ जणांचा पहिला डोस तर १९ हजार ८६३ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. कालावधी वाढल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे. (duration increased number of people taking second dose Maval increased 25 percent)

मावळ तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरळीत सुरु आहे. लसीकरणासाठी पुरेशी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
– डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्याधिकारी, मावळ तालुका
Esakal