दारुवाला पुल : रस्त्यावर पडणाऱ्या पावलांची संख्या लॉकडाउनमुळे नसल्यातच जमा आहे. परंतू ज्यांचे पोट चपलांच्या दुरस्तीतून भरतं. त्यांच काय? (सकाळ छायाचित्रकार :प्रमोद शेलार)बुधवार पेठ : कोरोनामुळे शहरात अंड्यांची मागणी वाढली आहे. सुटीच्या वेळेत दोन पैसे मिळविण्याचे साधन म्हणून अंडी विकताना हा विद्यार्थी.(सकाळ छायाचित्रकार :प्रमोद शेलार)गणेश पेठ : तंत्रज्ञानाच्या प्रगतीने पोटपाण्यासाठीचा रोजगार हिरावून घेतला. तरीही मिळेल तेवढ्या कामावर आजचे गुजराण करताना रमेश गुजर. निवडक जुन्या वकीलांची टंकलेखणाची कामे ते आपल्या जुन्या टाईपरायटरने करत आहे.(सकाळ छायाचित्रकार :प्रमोद शेलार)खडकी: ज्यांचे रोजचे जगणच जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यांना कोरोनासाथीचे काय नवल. पोटाची भूक मिटविण्यासाठी निर्मणुष्य असलेल्या रस्त्यांवर उन्हातान्हात भांडी व घरगुती साहीत्य विकण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला.शनिवार वाडा: आम्ही भिकारी नसून भूकेले आहोत, हीच भावना या कामगारांची असावी. कडक निर्बंधमुळे रोजगार हिरावून घेतला. पण गावाकडे जाण्याची सोय नाही. अशा वेळी मिळेल त्या भिक्षेवर रोजचा दिवस ते ढकलत आहे. (सकाळ छायाचित्रकार :प्रमोद शेलार) शनिवारवाडा : हाताला काम नाही म्हणून लोक पदरात देतील ते खाण्याची वेळी एका स्वाभिमानी आईवर आली आहे. आपल्या चिमुरड्यांना आनंदाने खाताना पाहून या आईचे पोट जनू समाधानानेच भरले असावे.(सकाळ छायाचित्रकार :प्रमोद शेलार)बालगंधर्व चौक : लॉकडाउनमुळे शाळेतील विद्यार्थी घरात आहे. पण जे जन्मापासूनच शाळाबाह्य आहे. अशा मुलांच काय? पोटाची खळगी भरविण्यासाठी कचराबॅगची विक्री करताना चिमुरडे.(सकाळ छायाचित्रकार :प्रमोद शेलार)