..जर आपण लग्नासाठी काहीतरी वेगळं करू इच्छित असणार्यांपैकी असाल, तर आम्ही आपल्याला 5 यूनिक विवाह थीम सांगू शकतो, ज्या आपल्याला पारंपरिक लग्नाचं फील देतील.इको फ्रेंडली वेडिंग (Eco Friendly Wedding Theme) : या प्रकारचे लग्न कोणत्याही फॉरेस्ट रिसाॅर्ट किंवा एखाद्या बागेत केले जाऊ शकते. कारण, या प्रकारच्या लग्नात कमी पैसे लागतात आणि खर्चही कमी होतो. या थीममध्ये शाकाहारी पदार्थांना सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यामुळे हा सोहळा अधिक सुंदर होण्यास प्रभावी ठरतो. यामध्ये विविध प्रकारच्या Eco थीमसची देखील खास सजावट केली जाते.बीच वेडिंग (Beach Wedding Themes) : बीच वेडिंगला डेस्टिनेशन वेडिंग देखील म्हटले जाते, परंतु आपण कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकत नसला, तरी आपण या थीममध्ये एक मोठा स्विमिंग पूल असलेल्या ठिकाणी बुकिंग करू शकता. यासाठी वॉटर रिसॉर्ट्स खूप सोयीस्कर ठरेल. यामध्ये आपल्याला ड्रेसअप शिवाय दागिने, पादत्राणे किंवा लेहेंगा देखील सुरक्षित ठेवावा लागेल.राजस्थानी विवाह थीम (Rajasthani Wedding Theme) : ही कदाचित; सर्वात मनोरंजक थीम असू शकते. राजस्थानचा इतिहास तुम्हाला आकर्षित करत असेल, तर ही थीम आपण निवडू शकता. आपण मेहंदी डिझाइनपासून ते हॉल सजावटीपर्यंत राजस्थानी लुक निवडू शकता. ही थीम संगीत आणि खाद्यपदार्थांमध्ये सर्वाधिक फेमस आहे. बांगड्या, रंगीबेरंगी दुपट्ट्यांसह यात सजावट केली जाते.रॉयल वेडिंग थीम (Royal Wedding Theme) : आपण परीकथेतून बाहेर पडल्यास, वास्तविक जीवनात आपण रॉयल जिंदगी जगू शकता. त्यासाठी आपल्या लग्नाची थीम ‘रॉयल’च असायला हवी. यात आपल्याला पॅलेसमध्ये जायचं नसेल अथवा डेस्टिनेशन वेडिंग करायचं नसेल, तर स्टेज थर्माकाॅल्सने सजविले जाऊ शकते. आपल्या शहरातील कोणत्याही हॉटेल किंवा लॉनबद्दल माहिती मिळविल्यास, ही थीमच आपल्या लग्नाला खास बनवू शकते.फेयरी टेल वेडिंग (Fairy Tale Wedding Theme) : फेयरी टेल वेडिंगमध्ये लग्न करण्यास कोणाची इच्छा होणार नाही? सुंदर सजावट आणि ‘परीकथा’ आपल्या लग्नाचा भाग बनू शकतात. जर हिवाळ्यात लग्नाचे नियोजन असेल, तर फेयरी टेल वेडिंग थीमवर बरेच काही केले जाऊ शकते. या थीमशी संबंधित काही कल्पना पेस्टल रंगाच्या सहाय्याने लग्नाच्या सजावटीपासून ते लेहेंग्यापर्यंत वापरल्या जातात. व्हाईट आणि पिंक थीममध्ये वेडिंग वेन्यू सजावट केली जाऊ शकते. आपण निळ्या रंगाच्या शेड्स देखील निवडू शकता. प्री-वेडिंग फोटोशूट्सपासून ते वेडिंग फंक्शन्सपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी या थीममध्ये आजमावू शकता.