मेहकर (जि.बुलडाणा) : जिल्ह्यातील मेहकरच्या अणिकट परिसरात अनिल माधव इंगळे यांच्या शेतात शेतीकामे काम करत असताना हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहेत. दगडाचे अवशेष आढळल्याने उत्सुकतेतून इंगळे यांनी अजून खोदकाम केलं असता या खोदकामात भव्य नंदी दिसून आले. त्यानंतर आणखी खोदकाम केल्यानंतर कोरीव पायऱ्या, खांब सापडले आहेत. (Buldana Hemadpanthi Temple Discovered In Buldana Mehkar Near Sharangdhar)

मंदिराचे अवशेष आढळल्यानंतर या परिसराला मेहकरचे तहसीलदार गरकल यांनी भेट दिली असून या अवशेषांची माहिती नागपूर येथील पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे. ते याठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

Also Read: हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

पैनगंगेच्या तीरावर हे हेमाडपंथी मंदिर शेकडो वर्षांपूर्वी नदीच्या पाण्यामुळे जलमय झाले असल्याचे जाणकार सांगतात. जमिनीपासून वीस फूट खाली हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळून आले आहे. खोदकाम अजूनही सुरुच असून खोदकामामध्ये अजून काय हाती लागणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

Also Read: शेगावचे गजानन महाराज ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र का म्हणायचे?

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी इंगळे यांच्या शेतात मोठी गर्दी केली आहे.

कंचनीचा महाल

शहराला मोठा ऐतिहासिक वारसा
मेहकर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये शेकडो वर्षे जुना कंचनीचा महाल आहे. ऐतिहासिक असं बालाजी मंदिरही आहे. तसंच ओलांडेश्वर मंदिराच्या बाजूला ऐतिहासिक कुंड दगडी सभामंडप आहे. मेहकर शहराच्या मध्यभागी पाचपीर बाबाचा दर्गा आहे. कंचनीच्या महालाची शीळ अजुनही जानेफळ रस्त्यावर कानावर गुंजत ना. घ. देशपांडेंना काव्यातुन गुंजली आहे. या एैतिहासिक शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागालाही असेच एैतिहासिक महत्व आहे. त्यात आता एक नवीन भर हेमांडपंथील मंदीराचे अवशेष सापडल्याने पडली आहे.

संपादन – विवेक मेतकर

Buldana Hemadpanthi Temple Discovered In Buldana Mehkar Near Sharangdhar

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here