पुणे : विनायक दामदोर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जंयती. भारताच्या स्वांतत्र्य लढ्यात सावरकरांनी मोलाची भूमिका निभावली आहे. सावरकरांच्या १८८ व्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी ट्विट करुन त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. ”स्वांतत्र्याच्या लढ्याचे महान सैनिक आणि प्रखर राष्ट्रभक्त वीर सावरकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन!” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले.

”स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर हे भारताच्या अखंडतेचे आणि संस्कृतीचे प्रखर समर्थक आणि जातीवादाचे प्रखर विरोधक होते. सावरकर जी यांनी आपल्या अखंड संघर्ष, जोरदार भाषण आणि अभिजात विचारांसह स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्याचा निर्धार आणि धैर्य आश्चर्यकारक होते.इंग्रजानी दिलेल्या काळ्या पाण्याच्या क्रुर शिक्षेत असंख्य यातना देखील वीर सावरकर यांनी स्वतंत्र्य भारताचा संक्लप मोडू शकले नाही. मातृभूमीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेली तपस्या, त्याग आणि समर्पण भावी पिढीचा वारसा आहे. स्वांतत्र्याच्या लढ्यातील महानायक वीर सावरकर यांच्या चरणी अभिवादन!” अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीस्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन केले.

”स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही विनम्र अभिवादन केले.

”स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य, शौर्यमूर्ती, थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन” अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले. ”ने मजसी ने परत मातृभूमीला…” या सावकरांच्या गीतच्या ओळीसंह व्हिडीओ देखील त्यांनी यावेळी ट्विट केला.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर राहात असणार्‍या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह क्रमांक एकमधील खोलीत आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्या स्वाती जोगळेकर, उपप्राचार्य नारायण कुलकर्णी, बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणीक, वसतिगृह प्रमुख डॉ.आनंद काटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या शासकीय निर्बंधामुळे खोली सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली नव्हती.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here