कोल्हापूर: अनेकांची ओळख वासावरून ठरवली जाते. कोणता परफ्यूम (perfume)आहे. यावरून कोणती व्यक्ती आली याचा अंदाज बांधला जातो. परफ्यूम आणि मानव असे गणितच आहे. अनेकांना सकाळी परफ्युम मारून ऑफिसला नाही गेले तर चुकल्यासारखं वाटतं. दिवसभर मिळणारा तो सुगंध फ्रेश (Fragrance Fresh)करून जातो. अशा या परफ्युमचा वापर आपण करतो. मात्र कधी हा विचार केला आहे का? परफ्युमच्या रिकाम्या बॉटल चा वापर देखील योग्य करता येऊ शकतो. कसा चला जाणून घेऊया. (home-made-use-a-perfume-bottle-tricks-marathi-news)

नेहमी महिलांच्या पर्समध्ये परफ्यूम, डीओ असतोच.दिवसभर ताजेपणा आणि मूड ठीक करण्यासाठी अच्छी खुशबू गरजेची असते.

पण तुम्हाला माहिती आहे का? परफ्युम ची बॉटल रिकामी झाली तर त्याचा वापरसुद्धा एक नवीन पद्धतीने करता येतो

जर तुमच्याजवळ परफ्युमची रिकामी बॉटल असेल तर तिला फेकून देऊ नका .त्याचा वापर असा करा की पुढे जाऊन ते तुमच्या उपयोगात येईल.
मुलांच्या प्रोजेक्टसाठी बनवा टेरारियम

टेरारियम एक अशी ग्लास बॉटल आहे, जिला सील करता येतं त्यानंतर त्याच्या आतमध्ये माती टाकून काही झाडे लावू शकतो.

बनवा आॅयल बर्नर

परफ्यूमच्या बॉटलला आॅयल बर्नर

बनवता येते ज्यामुळे घराला सुगंधित करण्यासाठी याचा उपयोग करता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला हवे थोडी मोठी कापसा पासून तयार केलेली वात. आणि इसेन्शियल ओईल मिसळलेले नारळाचे तेल

फ्लावर वास

तुम्हाला तुमचं घर नॅचरल डेकोरेट करायचं असेल तर जुन्या परफ्यूमच्या बॉटलमध्ये एखादे फुल ठेऊन द्या. काळजी घ्या की त्यामध्ये वास असणार नाही.

ज्वेलरी होल्डर

परफ्यूमच्या बॉटलला ज्वेलरी होल्डर देखील बनवता येते. हे होल्डर बनवत असताना एक काळजी घ्या.पहिल्यांदा ती बॉटल गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या ज्यामुळे तुमच्या ज्वेलरीला गंज चढणार नाही.

अशा क्रिएटिव्ह ट्रिक्सचा कसा वापर करून तुम्ही परफ्यूम बॉटल अशा पद्धतीने वापरू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here