तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि विकेंडला कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात निवांत फिरायला जाण्याचा विचार करताय? तर मग दिल्लीच्या जवळपास हे ऑफबीट ठिकाणं तुम्हाला नक्कीच आवडतील… आवर्जून भेट द्या… पंगोट, उत्तराखंड (३१० किमी)- नैनिताल जिल्ह्यात डोगंरात वसलेलं पंगोटा शहर विकेंड ट्रिप साठी परफेक्ट ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे ज्यांना आवडतं अशा पर्यटकांसठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तुम्हाला पक्षिनिरीक्षणाची आवड असल्यास या भागात ५८० पक्षांच्या जाती देखील आढळतात, त्यामुळे या ट्रिप दरम्यान तुम्ही पक्षिनिरीक्षणाचा देखील आनंद घेऊ शकता.बिनसर, उत्तराखंड (४०० किमी)- बिनसर हे ठिकाण उत्तराखंडमधील अल्मोडापासून ३४ किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही हिरवीगार वनराई आणि वन्यजीव अभयअरण्य पाहू शकता. समुद्रसपाटीपासून २४०० मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण कुमाऊँ क्षेत्रातील सर्वात उंच हिलस्टेशन्सपैकी एक आहे.फागू, हिमाचल प्रदेश (३८० किमी)- फागू, शिमलाच्या कुफरी भागातील अतिशय सुंदर शहर आहे. या ठिकाणहून तुम्ही उंचच उंच हिमालयच्या शिखरे पाहू शकता. सुंदर घरे आणि हिरवळ या शहराल परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन बनवते. या ठिकाणी तुम्ही तुमचा विकेंड अगदी मजेत घालवू शकता.कौसानी, उत्तराखंड (३९८ किमी)- कौसानी हे समुद्रसपाटीपासून ६०७५ फुट उंचीवर वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. हिमालयाच्या पर्वतशिखरांसोबत या ठिराणी तुम्ही नंदाकोट, त्रिशूल आणि नंदा देवी पर्वत देखील पाहू शकता. महात्मा गांधी यांनी या ठिकाणाला भारताचे स्वित्झरलँड म्हटले होते. नौकुचियाताल, उत्तराखंड (३२० किमी)- हे पर्वतांमध्ये वसलेलं शहर त्याठिकाणी असलेल्या शांत आणि सुंदर तळ्यांसाठी प्रसिध्द आहे. या शहराचे नाव देखील नऊ कोपरे असलेल्या एका तळ्याच्या नाववर ठेवण्यात आले आहे. तुम्ही तुमचा विकेंड निवांत घालवण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. नाहन, हिमाचल प्रदेश (२४८ किमी) हे हिमाचल प्रदेशमधील अत्यंत सुंदर आणि शांततापुर्ण शहर आहे. शिवलिक पर्वताच्या मध्ये वसलेले हे शहर दिल्लीच्या जवळ पर्यटनासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. या ठिकाणाची सुंदरता तुमच्या मनात कायमचे घर करुन राहील हे नक्की.