पुणे – सकाळ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) सकाळ सोशल फाउंडेशनच्यावतीने (Sakal Social Foundation) मानसिक स्वास्थ्य व मानसिक समुपदेशनासाठी राबविण्यात येणाऱ्या we are in this together या अभियानांतर्गत व सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन) (Sakal NIE) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी व पालकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांमध्ये होणारे मानसिक बदल, समजून घेताना याविषयी आज (शनिवारी) दुपारी बाराला झूम वेबिनार (Zoom Webinar) च्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. (Teacher Parents Webinar Dr Yjyoti Singh Guidance)

Webinar

या वेबिनारच्या माध्यमातून बिशप स्कूलच्या शालेय मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख मानसतज्ज्ञ डॉ. यज्योती सिंग मार्गदर्शन करणार आहेत. त्या पुण्यातील बिशप स्कूलमध्ये वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून विकास मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी, तत्कालीन पुणे विद्यापीठातून विशेष शिक्षण विषयात बीएड पदवी व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सामाजिक शास्त्र विषयात पीएचडी आदी पदव्या संपादित केल्या आहेत.

याशिवाय चेतना समुपदेशन केंद्राच्या २००८ पासून संस्थापक प्रमुख म्हणून त्या काम पाहत आहेत. तसेच २०१७ पासून बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध काम करणाऱ्या मुस्कान संस्थेच्या सल्लागार समितीच्या त्या सदस्या आहेत. महाराष्ट्र फेलोशिप ऑफ डेफ या संस्थेत कर्णबधिरांसाठी सल्लागार मानसतज्ज्ञ म्हणून २०१७ पासून त्या कार्यरत आहेत.

याचबरोबर शिक्षक प्रशिक्षण, पालकत्व, सकारात्मक मानसिक आरोग्य व बालविकास या विषयांवर त्यांनी विविध ठिकाणी सातशेहून अधिक कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here