बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्मात आणि अभिनेता अनुराग कश्यपची नुकतीच (anurag kashyap ) अँजिओप्लास्टी (angioplasty) झाली. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वैदयकीय सल्लानुसार त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता अनुराग रूग्णालयामधून घरी परतला असून प्रकृती ठीक आहे. त्याची मुलगी आलियाने सोशल मीडियावर अनुरागचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (anurag kashyap daughter aliayah shares directors first picture after angioplasty)

आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुराग वेगळा दिसत आहे. त्याने डोक्यावरचे केस काढले आहेत. अनुरागच्या या बदलेल्या लूकमुळे त्याचे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले. आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुराग स्मित हास्य देताना दिसत आहे. पीटीआयसोबत बोलताना अनुरागच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले, ‘अनुरागची अँजिओप्लास्टीच्या झाली आहे. त्याची प्रकृती आता बरी आहे. ज्यांनी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली त्यांचे धन्यवाद’.

anurag kashyap

Also Read: ‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’; अनुपम खेर भडकले

गैग्स ऑफ वासेपुर, ब्लैक फ्रायडे , रमन राघव 2.0 , देव डी या सुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शन अनुरागने केले आहे. लवकरच अनुरागचा दोबारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे..या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here