दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यातच दही खाणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. दह्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. म्हणूनच, दही खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. दह्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लॅक्टोज आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे उन्हाळ्यात दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दही खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते. दही लो फॅट असून त्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे दही खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतं. धकाधकीच्या काळात प्रत्येक जण धावपळ करत असतो. त्यातच घरची जबाबदारी, ऑफिसचं काम यामुळे अनेक जण तणावपूर्ण आयुष्य जगत असतात. दही खाल्ल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. दह्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे थकवा व ताण कमी होतो. दह्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. दही खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. अपचन, अॅसिडीचा त्रास होत असेल तर २ चमचे दही खावं. दह्यामुळे पोट साफ राहते. चुकीच्या आहारपद्धतीमुळे आजकाल अनेक जण बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे दररोज दुपारी जेवणात दह्याचा समावेश करावा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स पोषक तत्वे असतात त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.