जळगाव ः शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्रीनंतर झालेल्या विजांच्या (Lightning) कडकडाटासह मान्सूनपूर्व (Pre-monsoon)पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, झाडे उन्मळून पडली. अनेक सखोल भागात पाणी साचल्याने नागरिकांना वाट काढणेही कठीण झाले होते. विजपुरवठाही बंद झाल्याने जिल्हा अंधारात होता. जळगाव शहरात विज पडून हरिविठ्ठलनगरात एका घराचे नुकसान झाले आहे. सोबतच विजेची उपकरणेही जळाली आहेत.
(jalgaon district pre-monsoon rains hit)
शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळीच पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र वारा नसल्याने पाउस झाला नाही. मध्यरात्रीनंतर मात्र जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. तो पहाटेपर्यंत सुरू होता. त्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उन्हापासून तापलेल्या जमिनीला पाण्यामुळे गारवा मिळाला आहे. अनेक शेतातमध्ये शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली होती. त्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी वखरणीची कामे सुरू केली आहेत. शहरातील हरिविठ्ठलनगराजवळील मुकुंदनगर भागात रामविलास इंगळे यांच्या घरावर पहाटे चारला विज कोसळली. घराचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान. भीतीला तडे गेले आहेत.

तालुकानिहाय झालेला पाऊस असा
जळगाव–१२.४०
जामनेर–१७.५०
एरंडोल—२१.२५
धरणगाव–२८.५०
भुसावळ–३५.२५
यावल–१४.५०
रावेर–७.७१
मुक्ताईनगर–१२.२५
बोदवड–२३.०७
पाचोरा–२४.४२
अमळनेर–०.००
पारोळा–४.६०
चाळीसगाव–९.२८
भडगाव–७.७५
चोपडा– १.२८
एकूण–२१९.७६ पाऊस
सरासरी १४.६५ मिलीमिटर पाउस झाला आहे.
Esakal