राजहंस (Bar-Headed Goose) : खटाव, माण तालुक्‍यांत आढळून येणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांच्या सर्वेक्षणासाठी वडूजमधील पक्षीमित्र डॉ. प्रवीण चव्हाण व किरकसाल (ता. माण) येथील चिन्मय सावंत सरसावले आहेत. या दोन्ही तालुक्‍यांत 200 हून अधिक जातींच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत.
पांढर्‍या भुवईचा बुलबुल (White Browed Bulbul) : सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागांतील खटाव, माण हे दुष्काळी तालुके आहेत. तालुक्‍यांत जलसंधारणाची कामे झाल्यामुळे येथील जैवविविधेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे हा भाग स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे.
पिवळ्या पायाची हरोळी Yellow Footed Green Pigeon : डॉ. चव्हाण व सावंत यांनी या तालुक्‍यांत आढळून येणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांचे सर्वेक्षणाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू केले आहे. तालुक्‍यातील विविध भागांत सुमारे 200 हून अधिक पक्षी, प्रजातींच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत.
नकटा बदक Knob Billed Duck : खटाव, माण तालुक्‍यांतील येरळा, माणगंगा नदीचा भाग, तसेच मायणी पक्षी अभयारण्य, येरळवाडी मध्यम प्रकल्प, सूर्याचीवाडी, कानकात्रे, ब्रिटिशकालीन नेर तलाव, वरुड, पेडगाव, परगाव, वाकेश्वर आदी ठिकाणचे पाझर तलाव या ठिकाणी पक्ष्यांचा वास्तव्य आढळून आले आहे.
रंगीत पार्खुडी Painted Sandgrouse : माण तालुक्‍यातील पक्षी क्षेत्रातील आदर्शगाव किरकसाल, लोधवडे, पिंगळी तलाव, राणंद तलाव, राजेवाडी धरण, म्हसवड, बनगरवाडी, भोजलिंग डोंगर या ठिकाणी पक्ष्यांच्या स्थानिक, तसेच स्थलांतरित अनेक प्रजाती आढळून आल्या आहेत.
कवडी मैना Pied Starling : किरकसालचे सरपंच अमोल काटकर, फुलपाखरू अभ्यासक विशाल काटकर हे देखील या कामात सहभागी आहेत.
प्राच्य चंडोल Oriental Skylark : गवताळ, तसेच पाणथळीतील पक्ष्यांचा शास्त्रीय पद्धतीने गणना, नोंदी, तसेच त्यांच्या अधिवासाचे संवर्धनासाठी ही पक्षीगणना करण्याचा विचार करण्यात येतो.
व्याध गरुड Crested Hawk Eagle : सर्वेक्षण ई-बर्ड या पक्षीविषयक संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर खटाव, माणचे “पक्षी वैभव’ या विषयावर विशेष संशोधन करण्यात येणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here