काही दिवसांपूर्वी श्री.जलील यांनी १ जूनपासून बाजारपेठा, दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती.
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी रविवारी (ता.३०) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी टीका केली आहे. श्री.जलील म्हणतात, की बँकांच्या कर्जाचे हप्ते, वीजबिल, पालिका कर, इंधनावरील कर कमी करणे, कोरोना रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार आदींबाबत महत्त्वाच्या घोषणा करुन जनतेला दिलासा देतील असे वाटले होते. पण मोदींप्रमाणेच (PM Narendra Modi) तुम्हीही फक्त बडबडच केली, अशी टीका त्यांनी ट्विट करुन केली आहे. (Imtiaz Jaleel Criticise Chief Minister Uddhav Thackeray Over Facebook Live)
Also Read: मोदींची सात वर्षांची कारकीर्द अपयशी : अमित देशमुख

काही दिवसांपूर्वी श्री.जलील यांनी १ जूनपासून बाजारपेठा, दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी, महापालिका, पोलिस आयुक्त यांच्यावर सर्वसामान्यांना एक न्याय आणि इतरांवर वेगळा यावरुन चांगलेच धारेवर घेतले होते.
Esakal