कुडाळ (सिंधुदूर्ग) : मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर (वय 90, मूळचे चेंदवण, ता. कुडाळ) यांचे काल दुपारी बाराच्या दरम्यान मुंबई येथे घरी निधन झाले.
संध्याकाळी हिंदमाता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. ते 60 वर्षे अभिनय क्षेत्रात होते. लोकनाट्याचा “राजा’ असा किताब मिळविणाऱ्या मयेकर यांनी वयाच्या 15 व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. दूरदर्शनवरील “गप्पागोष्टी’ ही त्यांची मालिका त्या काळी प्रचंड गाजली होती.
हेही वाचा– त्या एकजुटीने देणार लढा : कशासाठी वाचा…
१५ व्या वर्षापासून रंगभूमीवर कामास सुरुवात
वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनयामुळे राजा मयेकर यांना लोकनाट्याचा राजा म्हणत असत. सुरुवातीच्या काळात त्यांनी दशावतारी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमी गाजवली.
हेही वाचा – *परदेशी दौऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या इंजिनियरची मैदानावर अखेर…
लोकनाट्याचा राजा हरपला
त्यांनी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले होते. राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास दशावतारी नाटकापासून सुरू झाला होता. “आंधळं दळतंय’, “यमराज्यात एक रात्र’ आणि “असूनी खास घरचा मालक’ ही तीन लोकनाट्ये तुफान गाजली होती. शिवाय “बापाचा बाप’, “नशीब फुटकं सांधून घ्या’, “कोयना स्वयंवर’ या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे राजा मयेकर यांचे अभिनयात पहिले पाऊल पडले. आपल्या कारकीर्दीविषयी बोलताना याचा उल्लेख ते नेहमीच करीत असत.

News Story Feeds