पिंपरी – कोरोनाविषयक (Corona) नियमांचे (Rules) उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दंड (Fine) ठोठावून गुन्हे (Crime) दाखल केले जातात. मात्र, या नियमातून राजकीय हस्तींना वगळले असावे, अशी शंका घेणारी घटना भोसरीमध्ये (Bhosari) घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त मांडव टहाळ्याचा कार्यक्रम जल्लोषात झाला. (MLA Mahesh Landage Daughter Marriage Rally Rules)

वाजंत्री, मिरवणूक, भंडारा उधळण, नृत्य अशा लवाजम्यात शेकडो लोकांची गर्दी होती. हा साऱ्या सोहळ्याची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. उपस्थितांची संख्या, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या नियमांचे कोठेही पालन झाले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांसह लांडगे यांच्यावर टिकेची झोड उडाली आहे. यानंतर लांडगे यांच्यासह तीन नगरसेवक व ५० कार्यकर्त्यांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.

Mahesh Landage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याचे आदेश आहेत. मात्र, बड्या लोकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसते आहे. आपले राजकीय वजन व वलय वापरून नियम धाब्यावर बसवत आहेत. दबाव असल्याने पोलिस व महापालिका प्रशासन यांच्याकडून या प्रकाराकडे कानाडोळा केला जातो. सामान्य लोक आपली हौसमौज बाजुला सारून अगदी थोडक्यात विवाह सोहळे आटोपून घेत असताना भोसरीचे आमदार लांडगे यांनी रविवारी जल्लोष केला.

Also Read: पिंपरीत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नाही

मुलीचा विवाह सोहळा सहा जून रोजी राजस्थान करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अधिक संख्येने लोक तिकडे नेता येणार नाहीत म्हणून विवाह पूर्वीचे सर्व विधी भोसरीतच जल्लोषात केले जात आहेत. यातीलच एक भाग म्हणजे मांडव टहाळा कार्यक्रम होता. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून आपापल्या फेसबुक पेज, व्हॉटसॲप ग्रुपपर पाठविल्याने ते व्हायरल झाले. यानंतर नेटिझन्सनी त्यांच्यावर टिकेची झोड उडवली. आमदारांवर कारवाई का नाही? असा सवाल करत भाजपला त्यामध्ये जबाबदार धरले आहे.

कार्यक्रमासाठी वाजंत्री, बैलजोड्या आणल्या होत्या. मिरवणुकही काढली. तसेच भंडारा उधळणीत उपस्थित सर्वजण न्हावून गेले. लांडगे यांनीही नृत्य केल्याचे छायाचित्र, व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here