सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात शासकीय वनांसह खासगी वनांचे क्षेत्र 85 टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्यात वन्य प्राण्यांची संख्याही जास्त आहे. हत्ती, माकड, डुक्कर, साळींदर, गवा रेडे, वन गाय आदी प्राण्यांपासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नाही. या उपद्रवी प्राण्याच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच सोडून दिले आहे, अशी खंत जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी शेती करणे दिले सोडून
ओरोस येथील कृषी महाविद्यालयात “वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान व उपाययोजना’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात सावंत बोलत होते. या वेळी भारतीय विज्ञान, शिक्षण व संशोधन संस्था, पुणे येथील माजी प्राध्यापक डॉ. मिलिंद वाटवे व प्रा. पूर्वा जोशी उपस्थित होते. तसेच, वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सर्जेराव सोनवडेकर उपस्थित होते.
हेही वाचा- वेंगुर्लेत राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिवपदी नम्रता कुबल…
उपस्थिती…
डॉ. मिलिंद वाटवे व पूर्वा जोशी यांनी वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचे सादरीकरण केले. अहवाल बनविण्यासाठी वन खात्याकडून सहकार्य करण्यात येईल, असे सर्जेराव सोनवडेकर म्हणाले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार गिते, उपप्राचार्य डॉ. धीरज पवार, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, बाळकृष्ण गावडे, डॉ. विलास सावंत, सरिता बेळणेकर, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, सुमेधा तावडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा– *परदेशी दौऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या इंजिनियरची मैदानावर अखेर…
सरकार दरबारी पाठपुरावा करू!
सावंत म्हणाले, की नुकसानीचे मोजमाप करण्याचे ठोस तंत्र उपलब्ध करण्याची गरज आहे. माकडांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जंगलात फळे व अन्नधान्य निर्मितीसाठी उपयोजना आखाव्यात. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या या जिल्ह्याचा नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करण्यात येईल. यासाठी वन खाते व सामाजिक संस्थांची मदत घेणार आहे. वन्य प्राण्यांचे नियंत्रण आणि नुकसान भरपाई यावर स्वतंत्र योजना राबविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात येईल.

News Story Feeds