सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा फटका सेलिब्रिटींना सर्वाधिक बसत असतो. एखाद्या फोटोशूटवरून, वक्तव्यावरून किंवा मग दिसण्यावरून अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री जुई गडकरीला Jui Gadkari अशाच घटनेला सामोरं जावं लागलं. जुईने सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंवर काही नेटकऱ्यांनी केलेले कमेंट्स पाहून जुई संतापली. ‘असेही अनुभव.. मी जे ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केले, त्यावर माझ्या फेसबुक पेजला आलेले हे कमेंट्स’, असं सांगत जुईने हे कमेंट्स आणि त्यावर तिने दिलेले उत्तर पोस्ट केले आहेत. (jui gadkari slams trollers who trolled for her recent black and white photoshoot)

‘सोशल मीडियावर जर तुला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर वादविवाद करणे आवश्यक आहे. अलका कुबल बनून राहशील तर तुझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. बघ प्रयत्न करून. मला अलकाजींवर टीका करायची नाही, पण इतका ताणलेला नम्र, सोज्वळ स्वभाव इकडे चालत नाही. या प्लॅटफॉर्मवर कसं सगळं हॉट पाहिजे असतं’, असा अजब सल्ला एका नेटकऱ्याने जुईला दिला. त्यावर जुईने नेटकऱ्याला उत्तर दिलं, ‘तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. पण मला हॉटनेसमध्ये रस नाही आणि ज्यांना मी आवडते ते माझ्याकडे नक्की बघतील. असो तुम्हाला शुभेच्छा.’

Also Read: TRP न मिळाल्याने फ्लॉप झालेल्या मराठी मालिका

जुईच्या फोटोंवर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत तिला कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहण्याचा सल्ला दिला. ‘मला तुझा अपमान करायचा नाही, पण जर तू सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलंस तर तुला कळेल की इथे प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. तुला जर रातोरात प्रसिद्धी हवी असेल तर मीडिया कॅमेरा घेऊन बसलीच आहे. प्रकाशझोतात राहायचं असेल तर कॉन्ट्रोव्हर्सी खूप महत्त्वाची आहे’, अशी कमेंट त्या नेटकऱ्याने केली. जुईने या नेटकऱ्यालाही तिच्याच अंदाजात उत्तर दिलं. ‘गेल्या दहा वर्षांपासून मला फक्त माझ्या कामाने प्रसिद्धी मिळवून दिली. रातोरात प्रसिद्धी मिळवण्यात माझा विश्वास नाही आणि हो, हा काही रिअॅलिटी शो नाही, जिथे तुम्ही बाद होऊ शकता. हे माझं आयुष्य आहे आणि ते मी माझ्या मूल्यांवरच जगेन’, असं जुई म्हणाली.

जुईने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’, ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जुईने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही भाग घेतला होता.

Also Read: प्राणीप्रेमी मराठी कलाकार; कोणाकडे दहा मांजरी तर कोणी पक्ष्यांना दिले जीवदान

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here