अभिनेता सलमान खानसोबत Salman Khan सुरू असलेल्या वादात आता अभिनेता गोविंदाकडून Govinda पाठिंबा मिळाल्याचं सूचक ट्विट कमार आर. खानने Kamaal R Khan केलं आहे. स्वयंघोषित चित्रपट समिक्षक केआरकेविरोधात सलमानने मानहानीचा दावा केला आहे. ‘बीईंग ह्युमन’ संस्थेमार्फक आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केआरकेने केला होता. त्याविरोधात सलमानकडून मानहानीचा दावा करण्यात आला आहे. तेव्हापासून केआरकेने सलमानला धडा शिकवणार असल्याचा निर्धारच केला आहे. याप्रकरणात विविध बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असल्याचाही दावा त्याने केला होता. आता त्याने केलेलं गोविंदासंदर्भातील ट्विट पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (KRK thanks Govinda bhai for support amid Salman Khan row)

‘गोविंदा भाई, तुमच्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी धन्यवाद. मी तुम्हाला निराश करणार नाही’, असं ट्विट केआरकेने केलंय. गोविंदा आणि सलमान यांच्यातील जुना वाद सर्वश्रुत आहे. याचाच फायदा घेत केआरकेने ट्विट केलं असावं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केआरकेने २०१९ मध्ये केलेल्या ट्विटमध्ये गोविंदावर टीका केली होती. ‘गोविंदा हा त्याच्या काळातील सर्वांत अनप्रोफेशनल अभिनेता होता. त्याने अनेक निर्मात्यांचं आर्थिक नुकसान केलं. आता त्याच्याशी बॉलिवूडमधील कोणीच संपर्क साधू इच्छित नाही. जसं कर्म कराल, तसं त्याचं फळ मिळेल’, असं ट्विट केआरकेने केलं होतं.

Also Read: ‘ये रिश्ता..’ फेम अभिनेता करण मेहराला अटक; पत्नीकडून मारहाणीचे आरोप

Also Read: ‘करिअर उद्ध्वस्त करुन त्याला मी रस्त्यावर आणेन’; केआरकेची सलमानला धमकी

केआरकेने त्याच्या ट्विट्समध्ये सलमान खानलाही धमकी दिली होती. ‘त्याने अनेक लोकांचं करिअर उद्ध्वस्त केल्याचं ऐकलंय. पण आता मी त्याचं करिअर बर्बाद करून त्याला रस्त्यावर आणेन’, असा निर्धार त्याने केला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here