अकोला: उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला (Summer Vacation) नेमकं कोठे जायंच, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल? परंतु, हिल स्टेशनला (Hill Station) जायचं म्हटलं की मन कसं आधिपासूनच हरखून जातं. भारतातील अनेक हिल स्टेशन्स पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात. खरं म्हणजे, हिल स्टेशन शोधायचं झाल्यास दक्षिण भारतातील रामेश्वरम (Rameshwaram Hill Station) अनेक पर्यटकांना आपल्याकडं खुणावतं. उन्हाळ्याच्या गर्मीत येथे गारव्याचा सुखद अनुभव घेता येतो. आणि एवढंच काय तर येथून मून्नारपासून ते उटीपर्यंतची अनेक पर्यटन स्थळं आपल्याला फिरायला आहेतच की. (know-about-some-beautiful-hill-stations-near-rameshwaram)

मुन्नार

दक्षिण भारतातील मनोहारी हिल स्टेशनबद्दल बोलायचं झाल्यास मुन्नारचं नाव घेतल्या जातंच. हे हिल स्टेशन कपल्ससाठी नंदनवनापेक्षा काही कमी नाही. तसं पाहिल्यास येथे आपल्यालाला कधीही जाता येतं. मात्र, सप्टेंबर ते मेपर्यंतचा काळ इथं फिरण्यासाठी उत्तम मानल्या जातो. येथे सुंदर वाटरफॉल्सपासून निसर्गाच्या सौदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो. येथे आणखी काही शोधत असाल तर इरावीकुलम राष्ट्रीय उद्यान, अथुकड फॉल्स, टी म्यूझियम यासारखी अनेक ठिकाणं आहेतच.

Also Read: प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा

उटी

अमाप असे निसर्ग सौदर्य, चहुबाजूंनी दाटलेली हिरवळ, देवदार वृक्षाने सजलेली वनराई यामुळे उटीच्या सौदर्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे.

उटीमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक म्हणजे येथील बॉटनिकल गार्डनची स्थापना १८२५ साली तत्कालीन जिल्हाधिकारी जॉन सुलीवन यांनी केली. या गार्डनमध्ये सौंदर्यासह बोटिंग, घोडेस्वारी हे प्रमुख आकर्षण आहे. येथील चिलून पार्क ही लहान मुलांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याठिकाणचे झोके व छोटे-छोटे डब्बे असलेली रेल्वे सर्वांचे लक्ष वेधून घेते. येथील रोझ गार्डनमध्ये १० एकर परिसरात विविध रंगांच्या गुलाबाची लागवड करण्यात आली आहे. हे सुंदर गुलाब पाहून या गार्डनच्या बाहेर पडायला नको वाटते. त्यासोबतच उटी म्युझियम संहालयाची १९८९ मध्ये निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू व कपडे यांचा संग्रह पाहण्यासारखा आहे. चेटींग क्रास हे चहासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. येथे बाहेरून आलेले पर्यटक येथील चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.

Also Read: Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील ‘अन्नपेढी’स मदतीचा हात!

देवीकुलम

देवीकुलम मुन्नारपासून आठ किलोमिटर अंतरावर मनोहारी पर्यटनस्थळ आहे. दक्षिण भारतातील हे सुंदर हिल स्टेशन पर्यटकांना वर्षानुवर्षांपासून आपल्याकडं खुणावतेय.

येथे मंगलम देवी मंदिर, एराविकुलम नॅशनल पार्क, चिनार वाईल्डलाईफ सेन्च्युरू आणि कुरिब्जीमाला सैन्चुरी सारखी अनेक ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत. यासह येथे सीता देवी लेक सुध्दा आहे. एका आख्यायिकेनुसा रामायण काळात देवी सिताने या ठिकाणी आंघोळ केली असल्यानेही हे ठिकाण पवित्र मानल्या जातं.

यरकौड

येथे चहुबाजूंनी दाटलेली हिरवळ, मनोहारी वातावरण पाहून येथून पायच निघत नाहीत. येथे पर्यटनासाठी सप्टेंबर ते मेपर्यंत चांगलं वातवरण असंत. येथे सर्वात मोठं आकर्षण स्थळ म्हणजे येथील लेक आहे. येथे थंडगार हवेचा आनंद घेता येईल. यासोबतच अन्ना पार्कमध्ये सुंदर फुलं बघायला मिळतील. तसेच शेवाराय मंदिर आणि भालू गुफा, बौटेनिकल गार्डन, पगौडा प्वाईंट, किलियुर वॉटरफॉल्स अशी अनेक ठिकाणं आहेत.

संपादन – विवेक मेतकर

(know-about-some-beautiful-hill-stations-near-rameshwaram)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here