सध्याच्या काळात अनेक तरुणांचा कल बिअर्ड लूक ठेवण्याकडे आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येक तरुणाची लांब वाढलेली दाढी पाहायला मिळते. यामध्येच काही जण दाढीचे केस पांढरे झाल्यामुळे त्रस्त आहेत. म्हणूनच, दाढीचे पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते पाहुयात. जवसातल्या ओमेगा 2 फॅटी अॅसिडमुळे दाढी-मिशांचे केस काळे राहतात. त्यामुळे आहारात जवसाचा समावेश करावा. दाढीचे केस काळे करण्यासाठी कांद्याच्या रसात तुळशीची पानं वाटून मिक्स करा. त्यानंतर हा लेप दाढी व मिशांना लावा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. आवळ्याची पूड, खोबरेल तेल उकळून घेऊन ते दाढी-मिशांना लावा. आहारात कढीपत्त्याचा समावेश करा. तसंच कढीपत्त्याची पानं पाण्यात उकळून ते पाणी दाढी व मिशांना लावा. कच्ची पपई वाटून त्यात चिमुटभर हळद व कोरफडीचा रस मिक्स करा व हे मिश्रण लावा.