बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे रिया चर्चेत आली होती. आता बिग बॉस- 15 मध्ये ती भाग घेणार आहे. लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘दया बेन’ ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दिक्षा वाकनी लवकरच बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये दिसणार आहे. दिक्षाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली त्यानंतर तिने कोणताच शो केला नाही. आता बिग बॉसमधून दिक्षा पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. दिक्षाला बिग बॉसमध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. अभिनेत्री अनुशा दांडेकर ही बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत ब्रेक अप झाल्यावर चर्चेत आली होती. अनुशा देखील बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे अशी चर्चा आहे. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतील अभिनेता पार्थ समथान बिग बॉसमध्ये भाग घेणार आहे. नागिन मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सुरभी चंदना. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बॉसमध्ये सुरभी एन्ट्री घेणार आहे.छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सनाया ईरानीने अचानक खतरो के खिलाडी या शो ला नकार दिला. आता बिग बॉसमध्ये ती भाग घेणार आहे अशी चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक देखील बिग बॉस- 15 मध्ये भाग घेणार आहे. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये कृष्णाची पत्नी कश्मिराने देखील भाग घेतला होता. राहूल वैद्यची प्रेयसी अभिनेत्री दिशा परमार देखील बिग बॉस-15 मध्ये भाग घेणार आहे. बिग बॉस-14 मध्ये राहूलने दिशाला लग्नाची मागणी केली होती. त्यानंतर दिशा चर्चेत आली. नागिन मालिकेतील बोल्ड ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा देखील बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे अशी चर्चा आहे.‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमधील अभिनेता मोहसिन खानला बिग बॉसमध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.