वेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : तालुक्यातील एका सेंटरवर आज घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे 22 विद्यार्थी अनधिकृतपणे बोगस बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे श्री. कुबल यांनी सांगितले.
परीक्षेला अनोळखी विध्यार्थी
राज्यात आज सर्वत्र शासनमान्य शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या. पाचवी व आठवीमधील विद्यार्थी या परीक्षेला बसवली जातात. वेंगुर्ले तालुक्यातील एका सेंटरमध्ये आज जे विद्यार्थी बसविण्यात आले, त्यामधील अनेक विध्यार्थी अनोळखी असल्याचे दिसून आले. पालकांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता ती बरीच मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नसून कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आली. त्यामुळे पालकांनी या बाबत आवाज उठवीत त्या मुलांना या सेंटरवर परीक्षेला बसण्याची परवानगी कोणी दिली, याचा जाब विचारत आहेत.
हेही वाचा– मुख्यमंत्र्यांचा उद्या रत्नागिरी दौरा : प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे आज तरी ऐकून घेणार का..?
पेपरवर वेगळ्या मुलांची नावे
दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य दादा कुबल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या हायस्कूलमध्ये धाव घेत पाहणी केली. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ही मुले तालुक्यातील एका हायस्कुलच्या नावावर बसल्याचे समोर आले आहे. येथील मुलांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. शाळेत या परीक्षेच्या सराव परीक्षा होतात. त्यावेळी या शाळेतील मुलांकडून एका वेळी एका विषयाच्या तीन किंवा चार पेपर लिहून घेतात. त्या पेपरवर वेगळ्या मुलांची नावे आसतात असे यावेळी मुलांनी पालकांशी बोलताना सांगितले. यावेळी श्री. कुबल यांच्यासह परबवाडा सरपंच पपु परब, तुळस चे माजी सरपंच आपा परब, सदस्य शेखर तुळसकर यांच्यासह पालक उपस्थित होते.
हेही वाचा– बाल मावळ्यांनी साकारले रायगड, तोरणा….
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान
घाटमाथ्यावरील मुले या परीक्षेत मेरिटमध्ये यावीत, यासाठी त्यांना वर्षभर या परीक्षेच्या क्लास ला बसविले जाते आणि अशा पद्धतीने एखाद्या शाळेतून त्यांना परीक्षेला बसविण्यात येते. या प्रकारामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या हायस्कुलच्या भूमिकेवर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. दरम्यान सभापती अनुश्री कांबळी यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

News Story Feeds