कणकवली ( सिंधुदुर्ग ) – रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात ठेवलेली बैठक ही केवळ शोभेसाठी आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केली.
ते म्हणाले “”राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही नारायण राणे यांनी घेतली होती. तेव्हा कोकणसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते; मात्र मुख्यमंत्री येत असताना हे येथे काय देणार आहेत, विमानतळाची पाहणी करणार असतील तर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काय?”
श्री. राणे म्हणाले, “”नाणार प्रकल्पाबाबत भाजपची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. आम्ही भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहोत; मात्र शिवसेनेने भूमिका जाहीर करावी. दोन-चार मंत्री येऊन मंत्रिमंडळाची बैठक घेणार असतील, जिल्ह्याचा विकास साधण्याची धमक शिवसेनेमध्ये आहे की भाजपच्या मांडीवर बसण्यासाठी शिवसेना आता प्रयत्न करत आहे. मत्स्य दुष्काळाबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, एलईडी मासेमारीला प्रोत्साहन कोण देते ? पालकमंत्र्यांनी केवळ भाग बदलला कार्य प्रवृत्ती मात्र जुन्याच पालकमंत्र्यांसारखी आहे. जिल्ह्याच्या बजेटमध्ये मोठी तरतूद केली; मात्र हाती काही लागलेले नाही.”

News Story Feeds