बुलडाणा : घटणारे उत्पन्न आणि आवाक्याबाहेर जात असलेला शेतीचा व्यवसाय असे गमक सध्या शेतकर्यांच्या नशिबात येत आहे. परंतु, शेतीतूनही काहीतरी वेगळे करून समृध्दीचा मार्ग शोधता येतो असा प्रयोग प्रत्यक्ष साकारत कोरोना परिस्थितीतही आर्थिक बाजू भक्कम करण्याचे धाडस मेहकर तालुक्यातील कल्याणा (Kalyana In Mehakar) येथील 11 शेतकर्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. (11 farmers discover direction of prosperity from Buldhana silk farm)
रेशीम शेती मधील कीटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात. परंतु या वर्षी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा कल्याणा येथील 11 शेतकर्यांनी मनरेगा अंतर्गत रेशीम कीटक संगोपन घेतले. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. सध्या 280 ते 310 प्रती किलोग्रॅम भाव कोषबाजारात आहे. या उत्पादनातून सदर शेतकर्यांना अंदाजे रु 1.5 ते 2 लक्ष रुपयांचे उत्पन्न निश्चितच मिळणार आहे.
Also Read: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ८ कोटींची बनवेगिरी
अवघ्या 18 दिवसात त्यांनी कोषाचे संगोपन पूर्ण केले आहे. रेशीम कोष जालना, पूर्णा, पाचोड व इतर कोष खरेदी करणारे व्यापारी यांना विक्री केली जाते. 2020-21 मध्ये कल्याणा येथील युवा शेतकर्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचे ठरविले.
या 11 लाभार्थ्यांनी रेशीम अधिकारी कार्यालयात नोंदणी केली. उद्योगाची परिपूर्ण माहिती घेतली. जून 2020 मध्ये तुती लागवड रोपांद्वारे करून नोव्हेंबर 2020 मध्ये रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. मनरेगा अंतर्गत कामा नुसार यथायोग्य मजुरी व तुती लागवडीच्या रोपांची रक्कम मिळाली. पहिले पीक हिवाळ्यात घेतले, परंतु पहिले पीक, त्यात ऋतुमानानुसार येणार्या अडचणींमुळे सरासरी उत्पन्न मिळाले. परंतु इतक्यावरच समाधान न मानता उन्हाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत रेशीम कीटक संगोपन घेण्याचे त्यांनी ठरविले.
Also Read: प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा
उन्हाळ्यात 40-43 डिग्री से.ग्रे तापमानात रेशीम कीटक संगोपन घेतले जात नाही. परंतु तापमान कमी करण्याच्या सर्व उपाययोजना करण्याचा त्यांनी निर्धार केला. बुलडाणा येथील जगदीश गुळवे यांचे कडून बाल कीटक (चॉकी म्हणजे दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम कीटक) घेतले. त्यानंतर प्रौढ कीटक संगोपन 15 ते 20 दिवसांचे ऐन उन्हाळ्यात सुरू केले. वेळोवेळी रेशीम कार्यालयाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. शेतकर्यांना सहाय्यक संचालक महेंद्र ढवळे, तहसीलदार डॉ. गरकल, रेशीम अधिकारी सु. प्र. फडके यांनी मदत केली.
Also Read: आमदारांची ‘बाहुबली’ स्टाइल, भर रस्त्यावर काढले शर्ट

असे केला उन्हाच्या गर्मीचा बंदोबस्त
संगोपन गृहाच्या नेटला पोते बांधून ड्रीपच्या पाइप ने पाणी सोडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी गणेश उफ राजू नरहरी ठाकरे यांनी संगोपन गृहाशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर सिंटेक्स टाकी चढविली व त्यातून ठिबक च्या पाइप द्वारे पाणी पोत्यांवर सोडले. पूर्ण संगोपन होई पर्यंत 30 ते 33 से ग्रे तापमान कायम राखले
संपादन – विवेक मेतकर
11 farmers discover direction of prosperity from Buldhana silk farm
Esakal