२४ मे ते ३० मे या आठवड्यात सर्वाधिक पाहिले गेलेले वेब सीरिज आणि चित्रपट कोणते याची यादी समोर आली आहे. ‘ऑरमॅक्स मीडिया आणि फिल्म कम्पॅनियन’ने ही यादी काढली आहे.

या यादीत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील ‘द लास्ट अव्हर’ या सीरिजने पहिलं स्थान पटकावलंय. या क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये संजय कपूर यांची मुख्य भूमिका आहे. या सीरिजला १० पैकी ८ IMDb रेटिंग्स मिळाले आहेत.
एमएक्स प्लेअरवरील ‘रनअवे लुगाई’ ही सीरिज दुसऱ्या स्थानावर आहे. या कॉमेडी सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.
अभिनेता अर्जुन कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट तिसऱ्या स्थानी आहे. नेटफ्लिक्सवर नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
हुमा कुरेशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘महारानी’ या सीरिजची सध्या फार चर्चा आहे. या सीरिजने चौथं स्थान पटकावलंय. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.
‘ब्रोकन बट ब्युटिफूल ३’ पाचव्या क्रमांकावर आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला मुख्य भूमिकेत आहे. अल्ट बालाजीवर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here