पुणे : ‘‘शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने महापालिकेच्या जम्बो रुग्णालयातील ७०० पैकी ३०० बेड कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०० आयसीयू बेड आणि २०० ऑक्सिजन बेडची सेवा सुरू राहणार आहेत,’’ असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महापालिकेने बंद असलेले जम्बो रुग्णालय २३ मार्च रोजी सुरू केले होते. ते रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू केल्याने अनेक रुग्ण जम्बोमधून ठणठणीत बरे होऊन घरी गेले. त्याच प्रमाणे रुग्णसंख्या वाढल्यानंतर ऑक्सिजन बचतीसाठीही जम्बोमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला. पुण्याबाहेरून ग्रामीण व इतर जिल्ह्यातील रुग्ण सुद्धा जम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

Also Read: पुण्यात सलून, ब्युटीपार्लर बंदच राहणार

बाणेरमधील ‘जम्बो’सतीन महिने मुदतवाढ

बाणेरमध्ये उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या जम्बो रुग्णालयाला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत आज (मंगळवारी) घेण्यात आला. त्यासाठी ७५ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.

भविष्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी बाणेर येथे दुसरे जम्बो रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय पुढील दोन महिन्यात तयार होईल. त्यामध्ये ऑक्सिजन वाढविण्यावर भर आहे. यात १५० फाउलर बेड असतील, त्यातील १३० बेड महापालिकेला खरेदी करेल तर २० बेड सीएसआरमधून मिळणार आहेत. आयसीयू बेड खरेदीसाठी इमर्सन एक्स्पोर्ट्स कंपनीच्या निधीतून १४ लाख ५२ हजार रुपये खर्च करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Jumbo Hospital

महापालिकेने आरोग्य सहाय्य योजनेअंतर्गत औषधे व इतर साहित्याच्या एमआरपीवर सर्वाधिक सवलत देणाऱ्या औषध विक्रेत्याकडून खरेदी केली जाते. एमआरपी पेक्षा तब्बल ७७ टक्के सूट देणाऱ्या ठेकेदाराचा प्रस्ताव मान्य केला आहे. महापालिकेकडून एकूण सात कोटी रुपयांची औषधे घेतली जाणार आहेत.

Also Read: ‘भाई’ बनण्याआधीच पुणे पोलीस आवळणार मुसक्या

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here