जळगाव ः गेल्या आठ दिवसात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत (Nagar Panchayat) , जळगाव शहर महानगरपालिकेतील (Jalgaon Muncipal Corporation) भारतीय जनता पार्टीचे (BJP) नगरसेवकांनी शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. त्यात शिवसेनेत प्रवेश केलेल्या काही नगरसेवकांच्या मुंबईतील (Mumbai) शिवसेना नेत्यांकडे जाण्याचे अचानक प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे हे नगरसेवक (Corporator) कशासाठी मुंबईत वारंवार चकरा मारत आहे याबाबत मात्र जळगाव शहरात व तसेच राजकीय (Political) वर्तूळात जोरदा चर्चा रंगू लागली आहे.

(jalgaon new joined shiv sena corporators increased visits in mumbai)

Also Read: तब्बल..३५ वर्ष आणि ते ही पुरुष सेवक चालवीत आहे अंगणवाडी

जळगाव महापालिकेत एप्रील महिन्यात मोठा राजकीय भुकंप होवून संत्तातरण झाले होते. भारतीय जनता पार्टीच तब्बल २७ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आणि महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर भाजपमधील फुटलेले नगरसेवकांमधून कुलभूषण पाटील उपमहापौर झाले होते. त्यात मागील आठ दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर २९ मेला जळगाव महापालिकेतील तीन नगरसेवक यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या वर्षा बंगल्यावर शिवेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले.

महापौर, उपमहापौरसह नगरसेवक मुंबईत

महापौर, उपमहापौरांपाठोपाठ भाजपातील बंडखोर नगरसेवकही मंगळवारी मुंबईत गेले होते. यावेळी त्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, विलास पारकर, संजय सावंत यांची भेट घेतली.

शहराच्या विकासावर चर्चा ?

जळगाव शहरातील विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधीपक्षनेते सुनिल महाजन, ललित कोल्हे यांच्यासह नवग्रह गु्रपमधील नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, गजानन मालपुरे, भरत कोळी, सुधीर पाटील, गजानन देशमुख, कुंदन काळे, उमेश सोनवणे हे गेले.

Also Read: कोकण पट्ट्यातून येणारी ‘मायनी गाडी’ची परंपरा कायम !

मुंबईत वाऱ्या कशासाठी ?

जळगाव महापालिकेत शिवसेनेची आता सत्ता असून शहराच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांना भेटण्यासाठी गेले असल्याचे बोलले जात आहे. मात्र गेल्या आठ दिवसात जिल्ह्यातील बदलेले राजकारण त्यात उपमहापौर भाजपच्या तीन नगरसेकांना घेवून मुंबईला जावून त्यांचा प्रवेश करून घेणे. तसेच नगरसेवकांना प्रवेशावेळी शिवसेनेकडून मिळालेले आश्वासन अद्याप पुरे झाले नसल्यामुळे या नगरसेवकांच्या वाऱ्या मुंबईत वाढलेल्या असल्याचे राजकीय वर्तूळात चर्चा आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here