कोल्हापूर : आपण घरी लोणी खरेदी करुन आणतो त्यावेळी ते पूर्ण पॅकेट खरेदी करतो. मात्र असे लोणी काही काळासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. काही वेळा ते बाहेर ठेवल्यास विरघळू जाते. लोणा फ्रीजमध्ये ठेवूनही खराब होते अशी अनेकांची तक्रार असते. मात्र तुम्हांला हे लोणी स्टोअर करण्याच्या काही टीप्स माहित आहेत का? ज्यामुळे ते काही दिवसांसाठी खराब न होता उत्तम राहू शकते. बदलत्या वातावरणामुळेही तुमचे लोणी किती दिवस टिकू शकते याचा अंदाज लावला जातो. (know how to store butter correctly)

सॉल्टेड आणि बाजारातून आणलेले लोणी

आपण जर लोणी बाजारतून खरेदी केले तर ते प्रक्रियायुक्त असण्याची शक्यता अधिक असते. कमर्शियल उत्पादने तयार करण्यासाठी यातील बॅक्टेरियाचा वापर केला जातो. याला कॉम्प्रेस करण्यासाठी 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात गरम केले जाते. यासाठी सॉल्टेड लोणीला तुम्ही दोन आठवड्यांसाठी रूम टेंपरेचरमध्ये ठेवू शकता. याला तुम्ही नॉर्मल कंटेनरमध्येही साठवून ठेवू शकता. हे जास्त गरम असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा थंडीच्या हंगामात तुम्ही याला रूममध्ये साठवू शकता.

किचन काऊंडरमध्ये लोणी साठवायचे असल्यास

किचन काउंडरमध्ये तुम्हाला लोणी साठवायचे असल्यास कोणत्या प्रकारच्या कंटेनरमध्ये ते स्टोर होते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही लोणी हवेशीर कंटेनरमध्ये साठवले तर याचा स्वाद उत्तम राहील आणि ते खाण्यासाठीही फ्रेश राहील.

Also Read: मॅगी शिल्लक असेल तर फेकू नका, बनवा जबरदस्त रेसीपीज्

घरच्या लोणी गोळ्याला स्टोअर कसे करावे

जर तुम्हाला अनसॉल्टेड किंवा घरी तयार होत असलेल्या लोणीला साठवायचे असेल तर फ्रिजमध्ये असलेल्या एका भागातमध्ये ठेवा. फ्रिजचे तापमान नेहमी बदलत राहते. त्यामुळे हे खराब होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला लोणी काही दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचे असल्यास तुम्ही सिरॅमिक या चिनीमातीच्या पॉटचा वापर करू शकता. ते लोणीला नरम आणि थंड ठेवते आणि त्यामुळे ते खराब होत नाही.

लोणीला फ्रीज करायचे असल्यास

जर तुम्ही लोणी घरीच तयार केले तर याचा वापर तुम्ही काही काळासाठी करू शकता. ते फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होत नाही. यासाठी एक पद्धत सोयीस्कर ठरू शकते लोणीचे छोटे-छोटे तुकडे करून तुम्ही याला रॅप करून ठेवू शकता. यामुळे लोणी बऱ्याच कालावधीसाठी फ्रेश राहू शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here