नाशिक शहरात होम आयसोलेशन मध्ये असलेल्या ८५ टक्के रुग्णांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र खोली नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
नाशिक : शहरात होम आयसोलेशन (home isolation) मध्ये असलेल्या ८५ टक्के रुग्णांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र खोली नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर (Covid care centre) मध्ये दाखल करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्पष्ट सुचना न आल्याने आता होम आयसोलेशन रुग्णांना घरगुती औषधांवरच उपचार करावे लागणार आहेत. (Decision of home isolated patients transfer in to Covid Center cancelled)
नाशिक रेड झोन मध्ये नाही
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली. मार्च व एप्रिल महिन्यात एक लाखांवर अधिक रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूच्या दरातही (Death Rate) सातत्याने वाढ झाली. शहरात ०.५९ टक्के मृत्यू दर होता गेल्या आठवड्यात एक टक्क्यांवर मृत्युदर पोहोचला होता. लॉकडाऊन (Lockdown) शिथिल करण्यापुर्वी रेड झोन (Red zone) असलेले जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली. नाशिक मध्ये कोरोना संसर्गाचा दर दहा टक्क्यांच्या खाली असल्याने नाशिक रेड झोन मध्ये पोहोचले नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले.
Also Read: नाशिककरांनो! घरीच टेस्ट करून मिळवा 6 तासात कोरोना रिपोर्ट

सर्वेक्षणाची प्रक्रिया मागे
रेड झोनची शक्यता लक्षात घेवून महापालिकेने रेड झोनचा शिक्का पुसण्यासाठी होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून ज्या रुग्णांना स्वतंत्र खोली नाही. अशा रुग्णांना महापालिकेच्या नवीन बिटको, समाज कल्याण, डॉ. जाकिर हुसेन रुग्णालय, संभाजी राजे स्टेडिअम मध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वेक्षणाची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली. मात्र राज्य शासनाकडून स्पष्ट सुचना नसल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया मागे घेण्यात आली असून होम आयसोलेशन मधील रुग्णांवर घरीचं उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
(Decision of home isolated patients transfer to Covid Center cancelled)
Also Read: …तर जिल्ह्यात पुन्हा कठोर निर्बंध
Esakal