कोल्हापूर : अनेक भन्नाट किस्से कोल्हापुरात (kolhapur) वारंवार घडत असतात. ‘हे कोल्हापूर हाय भावा, इथे सगळं विषय हार्डच असतात’. असे आनंदात सांगण कोल्हापूरकर कधीच विसरतं नाहीत. प्रत्येक विषय, घटनेकडे इथे सकारात्मकतेने (positive) पाहिले जाते. कोल्हापूर ही कलानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्ती ही कलाकार असतेच. काही विषेश कौशल्य (skill) किंवा गुणवैशिष्ट्ये असतात. कोणत्याही गोष्टीत कधीच हार न मानणाऱ्या कोल्हापूरकरांनी वेगवेगळ्या संकटांना मोठ्या धैर्यान तोंड दिले आहे. अनेक संकटांचा सामना करत एकमेकाला माणूसकीच्या नात्यानं जपलं आहे.

आयुष्यात कितीही दु:ख असुदे प्रत्येकाचा आनंद घेत जगणे हे सूत्र वापरणाऱ्या कोल्हापुरात एक कौतुकाची गोष्ट घडली आहे. हौसेला मोल नसते असं नेहमी म्हंटल जातं. बहिणीच्या (sister brother love) याच हौसेपायी दोघा भावांनी तिची पाठवणी चक्क फुलांनी सजवलेल्या रिक्षातून केली आहे. ही अनोखी शक्कल लढवली आहे, कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड (fulewadi ring-road) परिसरातील, आहिल्याबाई होळकर नगरात राहणाऱ्या आशुतोष चाबूक – पाटील आणि अक्षय चाबूक – पाटील या दोघा भावांनी. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीचे लग्न झाले. विवाहित बहिणीला तिच्या सासरी हातकणंगले तालुक्यातील (hatkangale tehsil) रेंदाळपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी त्यांनी रिक्षा सजवली आहे. तिच्या हौसे आणि इच्छेपोटी दोघा भावांनी आपली जबाबदारी पार पाडली.

Also Read: महापूर व्यवस्थापनावर जलसंपदामंत्र्यांच्या बैठकीत केवळ चर्चाच

कोरोनाच्या काळातही अनेकांनी बरेच चढउतार पाहिले आहेत. परंतु असे असूनही जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत. मात्र या कठीण प्रसंगांनाही हसत हसत सामोरे कसे जावे आणि या काळातही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा कसा असावा याचे उदाहरण या भावांनी आपल्या बहिणीसाठी दिलेले एक छोट्याशा सरप्राईज मधून पहायाला मिळतं. रिक्षाला फुला – पानांची आकर्षक सजावट केली होती. ही सजावट करण्यासाठी त्यांना तब्बल ३ तास लागले. मात्र लॉकडाउन असतानाही आमच्या लाडक्या बहिणीची हौस पूर्ण झाली. यामुळे तिच्या चेहऱ्यावर खुलंलेले हसू आणि आनंदाला कशाचीच उपमा नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here