कऱ्हाड (सातारा) : ओढ्यावर अतिक्रमण (Encroachment) करुन बांधकाम करण्यात आल्याने पावसाचे पाणी थेट खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांच्या घरात घुसले. त्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे (Uttam Dighe), तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तेथील पाहणी करुन ओढा मुजवणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकास तातडीने ओढ्यावरील अतिक्रम काढून ओढा पूर्ववत वाहता करण्याच्या सूचना तहसीलदार वाकडे यांनी दिल्या आहेत. (Rain Water Entered Into The House Of MP Shrinivas Patil Due To Encroachment Satara Marathi News)

कऱ्हाडला मुसळधार पाऊस झाला असून कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

कऱ्हाडला काल (मंगळवारी) मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून रस्तेही जलमय झाले. पावसाचा जोर मोठा असल्याने पावसाचे साचलेले पाणी अनेक ठिकाणी घुसून नुकसान झाले. गोटे येथील ओढ्यावर अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे गोटेतील नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. त्याचा फटका खासदार पाटील यांच्या बंगल्याला बसला. संबंधित ओढ्याचे पाणी प्रवाहीत होवून पाण्याचे लोट थेट खासदार पाटील यांच्या बंगल्यात घुसले. त्यामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले.

Rain Water

Also Read: पदोन्नती आरक्षणावरुन सरकारमध्ये मतभेद?; काय सांगते भारतीय संविधान?, वाचा सविस्तर..

त्याची माहिती मिळतात प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार वाकडे यांनी तेथे जावून पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथून जवळच असलेल्या एका ओढ्यावर बांधकाम झाल्याने तो ओढा बऱ्यापैकी बुजल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील साचलेले पाणी खासदार पाटील यांच्या घरात घुसले. पाहणीनंतर तहसीलदार वाकडे यांनी संबंधित ओढ्यावरील अवैध बांधकाम तातडीने काढून ओढा पूर्ववत वाहता करावा, अशा सूचना संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिल्या आहेत. मंडल अधिकारी व तलाठी यांना तातडीने कार्यवाही करुन अहवाल देण्याच्या सूचना दिल्याचे तहसीलदार वाकडे यांनी सांगितले.

Rain Water Entered Into The House Of MP Shrinivas Patil Due To Encroachment Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here