मध्य रेल्वेचा अजब-गजब कारभार ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई: मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रत्येक स्थानकावरील प्रत्येक ठिकाणी सरकते जिने उभारण्याचा (Escalator) सपाटा लावला आहे. यामध्ये टिटवाळा (Titwala) येथे देखील सरकत्या जिन्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या सरकत्या जिन्याचे बांधकाम अजब-गजब (Weird) असल्याचे दिसून येत आहे. सरकत्या जिन्यावर जाण्यासाठी आधी पाच-सहा पायऱ्या चढाव्या लागणार, मग सरकत्या जिन्याचा वापर करता येणार आहे, असा अजब कारभार या स्थानकावर दिसतोय. त्यामुळे मध्य रेल्वेचा प्रवासीभिमुख सेवा देण्याचा उद्देश अपंग (Handicapped), वृद्ध (Senior Citizen) व गरोदर महिलांना (Pregnant Women) लाभदायक ऐवजी त्रासदायक होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. (Titwala Railway Station Escalator Photo Viral Commuters Criticize weird constructions of stairs)

Also Read: परळचं ‘हाफकिन’ वर्षभरात बनवणार Covaxin लसीचे 22.8 कोटी डोस

प्रवाशांना पादचारी पुलावर जाण्यासाठी, एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी सरकत्या जिन्यांची उभारणी केली जात आहे. मध्य रेल्वे मार्गावरील महिला, गरोदर महिला, अपंग, वृद्ध प्रवाशांसाठी मुख्यत: सरकते जिने बसविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना जिन्याच्या पायऱ्या चढण्यापासून सुटका होईल. यासाठी प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी एकूण 76 हून अधिक सरकते जिने बसविले आहेत. तर, यावर्षी आणखी 10 सरकते जिने बसविण्याचे काम सुरू आहे. यात टिटवाळा येथील रेल्वे स्थानकाचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक तीनवरील मध्यभागी असलेल्या पादचारी पुलावर सरकता जिना जोडला गेला आहे. मात्र, सरकता जिन्यावर जाण्यासाठीच पाच ते सहा पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. त्यामुळे सरकता जिन्यावर जाण्यासाठी पायऱ्या नसाव्यात. जमिनीशी समतोल असलेला सरकता जिना उभारण्यात यावा, असे प्रवाशांनी सांगितले.

Also Read: “अतुल भातखळकर थोबाडावर आपटले”; मनसेचा भाजपवर ‘व्हिडीओ’वार

मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकातील सरकते जिने जमिनीशी समतोल आहेत. कुठल्याच सरकत्या जिन्यावर जाण्यासाठी आधी पायऱ्या चढाव्या लागत नाहीत. मात्र, हा सरकता जिना पाच-सहा पायऱ्यांवर उंच करण्यामागे मध्य रेल्वेने कोणते गणित केले आहे. पादचारी पूल आणि फलाट यामधील उंची मोजण्यात गफलत झाली की सरकत्या जिन्यांचीच लांबी कमी पडली आहे, असे प्रश्न उद्भवत आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या चुकलेल्या बांधकामामुळे प्रवाशांना नाहक पाच-सहा पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. मुळात सरकत्या जिन्यांच्या उद्देशाला छेद दिला जात आहे. पूरात फक्त एकच सरकता जिना बुडेल का, इतर बुडणार नाहीत का ? चार महिन्याच्या मान्सूनसाठी इतर आठ महिने वृद्ध, गरोदर महिला, अपंग यांना त्रास सहन करावा लागेल, असे प्रवासी केतन कान्हेरे यांनी सांगितले.

असे जिने का? रेल्वे प्रशासन म्हणते…

सरकत्या जिन्याचे बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात पूरापासून सरकत्या जिन्यांचा बचाव करण्यासाठी अशाप्रकारे बांधकाम सुरू आहे, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here