मुंबई: ठाण्यातील (Thane) एका खाजगी इमारतीत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या (Crime Branch Unit 1) अधिकाऱ्यांनी छापा (Raid) टाकून एका सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफार्श उद्धवस्त केले. महत्वाची बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये दोन महिला या अभिनेत्री (Bollywood Actresses) असल्याचे सांगितलं जात आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात एका खाजगी इमारतीत हे रॅकेट सुरू होतं. त्यात या अभिनेत्री सामील असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे रॅकेट सुरू असलेल्या फ्लॅटचा मालक, एक महिला आणि एक पुरुष दलाल (Agent) यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. कोविडमुळे (Covid 19) चित्रीकरण बंद झाल्याने या सिने-नट्या वेश्याव्यवसायाकडे (Prostitution Business) वळल्याचे पोलीस तपासात समोर आले. आणखी एक बाब म्हणजे या सेक्स रॅकेटची (High Profile Sex Racket) पाळमुळं मुंबईपर्यंत गेली असून अनेक बड्या अभिनेत्री यात सामील असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. (Sex Racket Busted two Bollywood actresses arrested in Thane by Crime Branch High profile prostitution business exposed)

ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत दोन अभिनेत्रींना अटक केली. ठाणे क्राईम ब्रांचला या रॅकेटची माहिती मिळल्यानंतर धाड टाकून त्यांनी ही कारवाई केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या. मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या. याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करता आल्या. वेश्याव्यवसाय करताना या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्री तामिळ सिनेसृष्टीतील मुख्य भूमिका करणाऱ्यांपैकी आहेत. बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी छोटी-मोठ्या भूमिका केल्या आहेत. वेश्याव्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सारं सुरू होतं असं सांगण्यात येत आहे. या रॅकेटमध्ये केवळ या दोन अभिनेत्रीच नसून आणखी बऱ्याच अभिनेत्रींचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन अभिनेत्रींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्याच्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एजंटच्या संपर्कात या अभिनेत्री आहेत. ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1 ने ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत असून यात अनेक बड्या अभिनेत्री यात समाविष्ट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here