पुणे – कोरोना (Corona) काळात जवळपास चार ते पाच लाख विद्यार्थी (Student) शिक्षणाच्या (Education) प्रवाहाबाहेर असतील, असे स्वयंसेवी संस्था, अभ्यासकांचे म्हणणे आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत (Special Campaign) २५ हजार २०४ विद्यार्थी शालाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाचे सर्वेक्षण सांगते, तर नववीतून (२०१९-२०) दहावीत गेलेल्या आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांची तफावत (Difference) आहे. मग नेमके हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Difference between Two and a Half Lakh Students Tenth)

कोरोना काळात कामगारांचे झालेले स्थलांतर, गमवाव्या लागलेल्या नोकऱ्या यामुळे जवळपास चार ते पाच लाख विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात बाहेर पडल्याची शक्यता विविध घटकांमधून वर्तविण्यात येते. परंतु शालेय शिक्षण विभागाने शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत तर केवळ २५ हजार २०४ विद्यार्थी आढळले. शिक्षण विभागाने गेल्या वर्षी (२०१९-२०) नववीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण, अनुत्तीर्ण याबाबतची आकडेवारी जाहीर केली. यात १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे दिसून येते. परंतु त्यानुसार १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात परीक्षेसाठी एकूण १६ लाख ५७ हजार ७९ अर्ज आले आहेत. त्यातील साधारणतः ५० हजार विद्यार्थी पुनःपरीक्षार्थी आहेत. म्हणजे साधारणतः १६ लाख नियमित विद्यार्थी आहेत. मग नववीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहता जवळपास अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.

Student

शिक्षण विभागाने यंदा कोणत्याही स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाशिवाय केलेल्या सर्वेक्षणात केवळ २५ हजार विद्यार्थी शालाबाह्य आढळले. परंतु गेल्या वर्षी नववीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करून केवळ एका इयत्तेतील शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या उघड झाली आहे. सरकारने शालाबाह्य विद्यार्थ्यांकडे आणि विशेष करून शिक्षणाच्या प्रवाहातून दुरावलेल्या मुलांचा शोध गंभीरपणे घ्यावा.

– बस्तू रेगे, प्रमुख, संतुलन संस्था, पाषाण शाळा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here