पुणे – मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन (Mumbai Pune Hyderabad Bullet Train) (हायस्पीड रेल कॅरिडोअर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे (Project) काम पावसामुळे (Rain) थांबले आहे. ढगाळ वातावरणामुळे विमानातून करण्यात येणारे लीडर सर्वेक्षणाच्या (Survey) (लाइट डिटेक्शन ॲण्ड रेजिंग सर्व्हे) कामात अडथळे येत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात तीन दिवसात अडीचशे किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. (Mumbai Pune Hyderabad Bullet Train Survey)
आतापर्यंत सोलापूर आणि त्या पुढील भागातील २५० किलोमीटर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी आयआयसी टेक्नॉलॉजी एअर क्राफ्ट या कंपनीकडून स्वतंत्र विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या बारामती येथून त्यांचे उड्डाण करून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. उर्वरित काम एका आठवड्यात संपण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा होणार फायदा…
-
बुलेट ट्रेन ताशी २५० ते ३२० या वेगाने धावणार
-
मुंबई ते हैदराबाद असे सुमारे ७११ किलोमीटरचे अंतर साडेतीन तासांत कापणार
-
ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्यात येणार
-
सध्या मुंबईवरून रेल्वेने पुण्याला येण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. हे अंतर ४५ मिनिटांवर येणार
-
पुण्यावरून हैदराबादला जाण्यासाठी आठ ते बारा तासांहून अधिक कालावधी लागतो. तो साडेतीन तासांवर येणार.
Esakal