श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक टन केमिकल घेऊन जाणारे माल वाहतूक जहाज बुडाले आहे. नौदलाने बुधवारी याची माहिती दिली.

नवी दिल्ली- श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक टन केमिकल घेऊन जाणारे माल वाहतूक जहाज बुडाले आहे. नौदलाने बुधवारी याची माहिती दिली. या दुर्घटनेमुळे श्रीलंकेचा माशेमारीसाठी संपन्न असणाऱ्या सागर किनाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेला सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी हा एक असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने बुधवारी 80 किलोमीटरच्या परिसरातील मासेमारीला बंदी घातली होती. याचा परिणाम 5,600 मासेमारी करणाऱ्या बोटींना सहन करावा लागला. हजारो सैनिक सागर किनारा स्वच्छ करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. (Chemical cargo ship MV X Press Pearl sinks off Sri Lanka rich fishing waters)

सिंगापूरमध्ये रजिस्टर असलेले MV X-Press Pearl 1,486 कंटेनर , 25 टन नायट्रिक अॅसिट आणि इतर केमिकल घेऊन जात होते. श्रीलेंकच्या किनाऱ्यावरुन जाताना 20 मे रोजी झालेल्या स्फोटात जहाजाला आग लागली. या काळात काही कंटेनर पाण्यात सोडून देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. बुधवारी हे मालवाहतूक जहाज बुडण्यास सुरुवात झाली. जहाजाला खोल पाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण अनेक तासानंतर तो प्रयत्न सोडून देण्यात आला, अशी मत्स्य मंत्री कंचना विजेयशेखरा यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

cargo ship MV X Press Pearl sinks

Also Read: मोदीच ठरलेत जगभरात ‘पप्पू‘ – नाना पटोले

श्रीलंकन हवाई दलाने जहाजाचे काही फोटो घेतले आहेत, ज्यात जहाजामधून पांढरा धूर येताना दिसत आहे. जहाज ज्या ठिकाणी बुडाले, त्याठिकाणी समुद्राची खोली 22 मीटर असल्याचं सांगितलं जातंय. जहाज बुडाल्याने मोठ्या प्रमाणात तेल समुद्राच्या पाण्यावर साचले आहे. त्याला काढण्यासाठी नौदल प्रयत्न करत आहे. MV X-Press Pearl 15 मे रोजी भारताच्या हझीरा बंदारातून निघाले होते. कोलंबोच्या मार्गे त्याला सिंगापूरकडे जायचे होते. पण, मार्गावर असताना जहाजाला आग लागली होती.

Also Read: पुलवामात दहशतवादी हल्ला; भाजप नेत्याची गोळी घालून हत्या

दरम्यान, या दुर्घटनेमुळे श्रीलंकेच्या मच्छीमारांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या जवळपास 15 दिवसांपासून त्यांनी माशेमारी बंद पडली आहे. आम्ही समुद्रात जाऊ शकत नाही, याचा अर्थ आम्ही जगण्यासाठी काही मिळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक मत्स्य संघटनेचे प्रमुख जोशुआ अँनथोनी यांनी दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here