आजरा (कोल्हापूर) : आजरा तालुक्यात वीस एकर क्षेत्रावर यंदा काळ्या तांदळाची (ब्लॅक राईस) (black rice)लागवड होणार आहे. तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या तांदळाचे आरोग्य दृष्टीने महत्त्व ओेळखून जाणकार शेतकरी प्रयोग(Farmer experiments) करणार आहेत. यासाठी आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन (Farmers Development Board)व सहकार्य मिळत आहे.काळा तादूळ हा वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे व त्याचबरोबर औषधी गुणधर्म असल्यामुळे याला बाजारात चांगली मागणी आहे. मणिपूर व पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात या तांदळाचे उत्पादन घेत आहेत. पोषणमूल्ये अधिक असलेल्या या तांदळाची भारत देशात उत्तरपूर्व राज्यात शेती केली जात आहे. (ajara-Farmer-experiments-in-black-rice-support-for-Farmers-Development-Board-kolhapur-news)

आसाम व अन्य राज्यात तांदूळ पिकवला जातो. औषधी गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाल्याने हा तांदूळ चीनमधून युरोपपूर्व देशापर्यंत पोहचला. सध्या पॉलिश केलेल्या तांदळातील गुणसत्त्व प्रक्रियेमध्ये नष्ट होत असल्यामुळे याला मागणी कमी होत आहे. त्यामुळे तांदळाची अधिक टरफल न काढलेली सत्त्वयुक्त ब्राऊन राईसला सध्या बाजारात मागणी वाढत आहे; पण यापेक्षा अधिक सत्त्वयुक्त व औैषधी मूल्य असलेल्या काळ्या तांदळाची मागणी देश-विदेशातून होत असून याला चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर पूर्व राज्यात या तांदळाची लागवड या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाली आहे.

हेही वाचा- मोडला सोन्याच्या संसार; एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू

राज्यात नागपूर विभागात कृषी विभागाने या तांदळाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले आहे. आजरा तालुक्यातही यंदा काळ्या तांदळाची भात लागवड शेतकरी करणार असून आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाने याचे बियाणे इच्छुक तीस शेतकऱ्यांना पुरवले आहे. तालुक्यात वीस एकर क्षेत्रावर याची लागवड होणार आहे.

काळ्या तांदळाची लागवड

तालुक्यात सुमारे चारशे एकर क्षेत्रावर आजरा घनसाळची लागवड होणार आहे. त्याचबरोबर वीस एकरवर काळाजिरग्याची पेरणी होईल. चंपाकळी, कोतमीरसाळ यासह विविध देशी वाण यंदा शेतकरी घेणार आहेत. यामध्ये काळा तांदळाची नव्याने भर पडली आहे.

काळ्या तांदळाची देश-विदेशात होणारी मागणी व त्याला मिळणारा चांगला दर तसेच हा तांदुळ वैशिष्ट्यपूर्ण असल्याने यंदा तालुक्यात याची लागवड केली जाणार आहे. तालुक्यातील हा पहिला प्रयोग असून यशस्वी ठरल्यास पुढील वर्षी लागवडीखालील क्षेत्र वाढेल.

– संभाजीराव सावंत, अध्यक्ष, आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here