धुळे : गेल्या शैक्षणिक वर्षावर कोरोना (Corona) महामारीचे (Epidemic) सावट कायमच राहिल्यामुळे सर्वच शाळा-महाविद्यालये (Schools-colleges) वर्षभर कुलूप बंदावस्थेत राहिली. ही स्थिती लक्षात घेत शिक्षण विभागाने दहावीपर्यंतच्या परीक्षा (Exam) रद्द केल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाने दर वर्षीप्रमाणेच यंदा १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे घोषित केले आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक पाहता आगामी नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइनच (Online Education) सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
(new academic year begins online)

Also Read: जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे १९१ बालकांनी गमावले पालक

जिल्ह्यातही हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष शाळा-महाविद्यालयात न जाता संपले. बहुतांश वर्ष ऑनलाइन शिक्षणप्रणालीने सरले. यात ऑनलाइन क्लासमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा पॅटर्न आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळा व शिक्षकांपासून दूर राहिल्याचे म्हटले गेले. या स्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नुकसानीची भरपाई करावी लागेल, असाही मतप्रवाह उमटत आहे. सरत्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन वर्गांना कंटाळलेल्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची नव्या शैक्षणिक वर्षातही लवकर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पारखे ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण, उजळणी वर्ग, स्वाध्याय पुस्तिका असे पर्याय शिक्षण विभाग उपलब्ध करून देण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. महानगरांमध्ये रुग्णसंख्या स्थिर असली तरी काही भागात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे.

सध्या विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गातील नेमक्या किती बाबी त्यांना कळल्या आहेत, याबाबत ठोस अंदाज शिक्षकांनाही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविल्यानंतर त्यांना आधीच्या वर्गातील विषयांचे नेमके किती आकलन झाले आहे, कौशल्ये विकसित झाली आहेत, याचा अंदाज घेऊन उजळणी घेणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यास साहित्यही विकसित केले जात आहे. गेल्या वर्षी केंद्राच्या दीक्षा या उपयोजनाच्या आणि व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचे प्रयोग शिक्षण विभागाने केले होते.

Also Read: बंडखोर नगरसेवकांच्या मुंबईत वाऱ्या..आणि चर्चेला उधाण !

दूरदर्शनच्या माध्यमातून धडे
‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ या उपक्रमाद्वारे व्हॉट्सअॅपवर स्वाध्याय पाठवत होते. त्यानंतर विविध सर्वेक्षणांमधून दूरदर्शन उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यंदा सर्वच वर्गांसाठी दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here